AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिका, इराण संघर्षामध्ये भारताला मोठी लॉटरी; मिळालं मोठं घबाड, पाकिस्तान, चीनचा नुसता जळफळाट

अमेरिका आणि इराणमध्ये संघर्ष वाढतच आहे, अमेरिकेनं आपल्या दोन युद्ध नौका मध्य पूर्वेत तैनात केल्या आहेत. यामुळे तणाव वाढला आहे. दरम्यान या वाढत्या तणावामध्येच आता भारतासाठी एक गुडन्यूज समोर आली आहे.

अमेरिका, इराण संघर्षामध्ये भारताला मोठी लॉटरी; मिळालं मोठं घबाड, पाकिस्तान, चीनचा नुसता जळफळाट
भारताचा मोठा फायदा Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 21, 2026 | 4:00 PM
Share

अमेरिका आणि इराण यांच्यामधील संघर्ष आता चांगलाच वाढला आहे, अमेरिकेनं आपल्या दोन विमानवाहू नौका मध्य पूर्वेत तैनात केल्या आहेत, सोबतच शेकडो फायटर जेट देखील पाठवले आहेत. तर दुसरीकडे अमेरिकेनं कितीही दबाव टाकला तरी इराण काही झुकताना दिसत नाहीये, इराणने देखील ओमानच्या खाडीमध्ये रशियासोबत संयुक्त युद्ध सराव सुरू केला आहे. हा अमेरिकेसाठी मोठा इशारा मानला जात आहे. अमेरिका आणि इराणमधील संघर्षामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताला मोठी लॉटरी लागली आहे.

एकीकडे अमेरिका आणि इरामध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच आहे. मात्र याच दरम्यान भारतासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. शुक्रवारी शेअर बाजारात मोठी उसळी बघायला मिळाली आहे, तर दुसरीकडे भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआयने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार भारताच्या परकीय चलनसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 6 फेब्रुवारी रोजी भारताकडे असलेला परकीय चलनसाठा हा 717.06 अब्ज डॉलर इतका होता, त्यामध्ये मागील आठवड्यात तब्बल 8.66 अब्ज डॉलरची वाढ होऊन, भारतामधील परकीय चलनसाठा हा 725.72 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे, हा आतापर्यंतचा सर्वोच्च परकीय चलनसाठा आहे.

तर दुसरीकडे सोन्याच्या साठ्यामध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या साठ्याचे मूल्य 4.99 अब्ज डॉलरने वाढून 128.46 अब्ज डॉलरवर पोहोचलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) मधील भारताच्या राखीव निधीमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. आरक्षित निधी 1.9 कोटी डॉलरने वाढून 4.73 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. सध्या रुपयामध्ये डॉलरच्या तुलनेत घसरण सुरू आहे, मात्र आता ही दिलासादायक बातमी समोर आली आहे.  दरम्यान शुक्रवारी अमेरिकेच्या सुप्रिया कोर्टाने डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका दिला आहे. टॅरिफचा निर्णय हा बेकायदेशीर असल्याचं तेथील कोर्टानं म्हटलं आहे. हा निर्णय अपमानकारक असल्याचं सांगत ट्रम्प यांनी पुन्हा सर्वच देशांवर आणखी 10 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. आता याचा भारतावर किती परिणाम होणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, केलं आवाहान...
Manoj Jarange Patil : अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, प्रत्येक मराठ्याला केलं आवाहन
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची...
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची अनुपस्थिती, बड्या नेत्याने थेट...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य झाल्यास...
कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर टीका...
Sanjay Raut | कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर सडकून टीका
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय...
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय घडामोडींना वेग
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला थेट इशारा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला दिला थेट इशारा
NTA मध्ये मोठा फेरबदल, IPS रवी कुमार सिंह यांची NTA संचालकपदी नियुक्ती
NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती
'हिम्मत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'- गंगाधर काळकुटे
Gangadhar Kalkute on Gunratna Sadavarte : काळकुटेंचं सदावर्तेंना आव्हान, 'हिंमत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'
राजीनामा द्या, आदिवासी आंदोलक अन् अशोक उईकेंमध्ये खडाजंगी
नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा मंत्री अशोक उईकेंविरोधात एल्गार: राजीनाम्याची मागणी