Bihar Election Result 2025 LIVE Streaming : बिहार निवडणुकीच्या निकालाला सुरूवात, जाणून घ्या एका क्लिकवर निकाल

Bihar Election Result 2025 LIVE Counting Date and Time : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल येण्यासाठी आता अवघे काही तासच शिल्लक आहेत. बिहारची सत्ता नेमकी कोणाच्या हाती जाते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Bihar Election Result 2025 LIVE Streaming : बिहार निवडणुकीच्या निकालाला सुरूवात, जाणून घ्या एका क्लिकवर निकाल
Bihar Election Result
| Updated on: Nov 14, 2025 | 8:19 AM

Bihar Election Result 2025 LIVE Vote Counting Today: बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार लावला. मतदान प्रक्रिया पार पडली असून आता प्रतिक्षा आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त निकालाची. आज बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल येणार असून पोल अगोदरच आली आहेत. बिहारमध्ये मतदानाचा एक नवीन विक्रम प्रस्थापित झाला. आता याचा फायदा कोणाला होणार हे चित्र आज स्पष्ट होईलच. दोन्ही टप्प्यांमध्ये एकत्रित 66.90 टक्के मतदान झाले, जे 2020 च्या तुलनेत 9 टक्के जास्त आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 65 टक्के आणि दुसऱ्या टप्प्यात 69.90 टक्के मतदारांनी मतदान केले. सर्वांचे लक्ष आता बिहारच्या 243 जागांसाठीच्या मतमोजणीकडे आहे. कोणाचे नशीब उजाडते आणि कोणाच्या पदरी निराशा पडते, हे समजेल.

मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा सत्तेत येतील की माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सत्ता हाती घेईल हे स्पष्ट होईलच. सकाळी मतमोजणी सुरू होईल, त्यानंतर सुरुवातीचे कल समोर येऊ लागतील. दुपारपर्यंत बिहारमध्ये नेमकी कोणाची सत्ता हे स्पष्ट होईल. नितीश कुमार यांच्या बाजूनेच निकाल लागेल असे काही पोलमध्ये पुढे आलंय. जशी जशी निकालाची वेळ जवळ येतंय तशी लोकांमधील उत्सुकता वाढताना दिसत आहे.

मतमोजणी आज 14 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार, मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू होईल. यावेळी, पोस्टल मतपत्रिका मोजण्याचे नियम बदलण्यात आले आहेत; मतमोजणीच्या शेवटच्या दोन फेऱ्यांपूर्वी त्यांची गणना केली जाईल. हळूहळू करून निकाल हाती पडतील. साधारणपणे उद्या दुपारपर्यंत निकालाचे सर्व चित्र स्पष्ट होईल आणि सत्ता नेमकी कोणाला मिळेल हे कळेल.

अधिकृत निकाल अपडेटसाठी, भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) वेबसाइटला (results.eci.gov.in) भेट द्या. बिहारच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अधिकृत वेबसाइटवर देखील लाईव्ह ट्रेंड उपलब्ध असतील.

टीव्ही9 मराठी https://www.tv9marathi.com/ किंवा https://www.tv9hindi.com/

टीव्ही9 मराठी लाईव्ह टीव्ही https://www.tv9marathi.com/live-tv

टीव्ही9 मराठी युट्यूब चॅनल – https://www.youtube.com/@TV9MarathiLive/

सह सर्व प्रमुख राष्ट्रीय आणि प्रादेशिक वृत्तवाहिन्यांवर मतमोजणीचे थेट कव्हरेज पाहू शकता.

बिहार विधानसभा निवडणूक 2025 साठी सर्व जिल्ह्यांमध्ये मतमोजणी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची एकूण 243 जागा मतमोजणी त्या जिल्ह्यात केली जाते, अधिक मतमोजणी केंद्रे स्थापन केली जातात. निवडणुकीचे प्रत्येक बारीक अपडेट आपल्याला टीव्ही9 मराठीच्या वेबसाईटवर मिळेल.

Watch Bihar Election Results LIVE Counting and Updates in Marathi