AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, बख्तियारपूरमध्ये काय घडलं?पाहा व्हिडीओ

बिहार (Bihar) चे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडलीय. नितीश कुमार यांच्यावर बख्तियारपुर मध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे.

Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, बख्तियारपूरमध्ये काय घडलं?पाहा व्हिडीओ
नितीश कुमार यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्नImage Credit source: Social Media
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Mar 27, 2022 | 7:49 PM
Share

पाटणा: बिहार (Bihar) चे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडलीय. नितीश कुमार यांच्यावर बख्तियारपुर मध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला सुरक्षारक्षकांनी पकडले आहे. आरोपीनं नितीश कुमार यांना कानाखाली मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. बिहार पोलिसांकडून (Bihar Police) मिळत असलेल्या माहितीनुसार हल्ला करणारा व्यक्ती हा मानसिक रुग्ण असल्याचं समोर आलं आलं आहे. मात्र, नितीश कुमार यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.

नितीश कुमार सुखरुप

पाटणा मधील बख्तियारपूरमध्ये नितीश कुमार यांच्यावर एका युकवानं हल्ला केला. त्यानं नितीश कुमार यांना बुक्की मारली आहे. यामध्ये नितीश कुमार हे जखमी झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. नितीश कुमार एका कार्यक्रमानिमित्त बख्तियारपूरमध्ये गेले होते.

नेमका कसा हल्ला झाला?

बख्तियारपूरमध्ये एका मूर्तीला हार अर्पण करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर मागील बाजूनं आलेल्या तरुणानं त्यांच्यावर हल्ला केला. नितीश कुमार एकटेच त्या मूर्तीला हार अर्पण करण्यासाठी पुढं गेले होते. सुरक्षा रक्षंकांसारखी कपडे घातलेला व्यक्ती त्यांच्या मागोमाग  गेला आणि त्यानं नितीश कुमार यांच्यावर हल्ला केला. या सर्व प्रकारामुळं तिथं खळबळ उडाली. वेळीच सुरक्षा रक्षक सावधान झाल्यानं नितीशकुमार यांना हल्लेखोर काही करु शकला नाही.

नितीश कुमार यांच्यावर यापूर्वी हल्ल्याचा प्रयत्न

मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर यापूर्वी देखील हल्ला झाला होता. बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तो हल्ला झाला होता. मधुबनी जिल्ह्यातील प्रचार सभेत एका व्यक्तीनं नितीशकुमार यांच्या दिशेनं कांदे आणि वीट फेकली होती. मात्र, त्यावेळी सुरक्षा रक्षकानं त्यांचा जीव वाचवला होता.

इतर बातम्या:

सांगलीत गोपीचंद पडळकरांनी डिजीटल गनिमी कावा नेमका कसा साधला? पाहा Video

केंद्रीय तपास यंत्रणांचा महाराष्ट्रात अतिरेक, सुप्रिया सुळेंचं पुढचं पाऊल; गृहमंत्री अर्थमंत्र्यांकडे तक्रार

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...