सांगलीत गोपीचंद पडळकरांनी डिजीटल गनिमी कावा नेमका कसा साधला? पाहा Video

मेंढपाळांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं लोकार्पण करण्याची मागणी पडळकर आणि खोतांनी केली. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखून धरलं. अशावेळी पडळकर यांनी पुन्हा एकदा पोलिसांना चकवा देत डिजीटल गनिमी कावा केलाय!

सांगलीत गोपीचंद पडळकरांनी डिजीटल गनिमी कावा नेमका कसा साधला? पाहा Video
सांगलीमध्ये गोपीचंद पडळकर यांचा गनिमी कावाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 27, 2022 | 7:45 PM

सांगली : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणावरुन राज्यात नवा वाद पाहायला मिळतोय. अहिल्यादेवी होळकर यांच्या सांगलीतील पुतळ्याचं लोकार्पण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, पवारांच्या हस्ते होणाऱ्या या लोकार्पण सोहळ्याला भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी तीव्र विरोध केलाय. इतकंच नाही तर आज सांगलीमध्ये पडळकर आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते सांगलीत जमा झाले होते. यावेळी मेंढपाळांच्या हस्ते लोकार्पण करण्याची मागणी पडळकर आणि खोतांनी केली. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखून धरलं. अशावेळी पडळकर यांनी पुन्हा एकदा पोलिसांना चकवा देत डिजीटल गनिमी कावा केलाय!

पडळकरांनी गनिमी कावा कसा साधला?

एकीकडे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना मल्हारराव होळकर चौकात पोलिसांनी अडवून धरलं होतं. त्यावेळी ढोल आणि धनगरी गाण्यांवर कार्यकर्त्यांचं पारंपरिक नृत्य, घोषणाबाजीने वातावरण चांगलंच तापलं होतं. पडळकर आणि खोत सातत्यानं पोलिसांसोबत चर्चा करत होते. आमचे पाच मेंढपाळ जातील आणि पुतळ्याचं लोकार्पण करतील, त्यासाठी परवानगी द्या, अशी मागणी ते पोलिसांकडे करत होते. जवळपास पाच ते सहा तास हा सगळा ड्रामा सुरु होता. त्याचवेळी ड्रोनद्वारे अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली आणि आमच्या दृष्टीने लोकार्पण पार पडल्याचा दावा पडळकर यांनी केला.

ड्रोनद्वारे पुतळ्यावर पुष्पवृष्टी

लोकांनी एखादी गोष्ट मनावर घेतली, लोकांनी कुठलं काम हाती घेतलं की कितीही पोलीस बंदोबस्त लावला तरी ते काम अडत नाही. 21 व्या शतकात टेन्कोलॉजीचा वापर करुन आम्ही ड्रोनद्वारे मेंढपाळांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली आहे. आमच्या दृष्टीने लोकार्पण सोहळा पार पडलाय. आम्ही ठरवलं होतं की पोलिसांसोबत कुठलाही वाद न करता हा सोहळा पार पाडायचा आणि आम्ही ते करुन दाखवलं आहे. आता पोलिसांनी आमच्या चार पोरांना ताब्यात घेतलं आहे. त्यांना सोडायला जातोय. त्यांना सोडल्याशिवाय आमचं काम पूर्ण होणार नाही, अशी प्रतिक्रिया पडळकर यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय.

इतर बातम्या : 

Breaking : पडळकरांचा डिजीटल गनिमी कावा! अहिल्यादेवी होळकर स्मारकावर ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी, लोकार्पण केल्याचा दावा

‘हा ड्रामा, हे ड्रामेबाज म्हणजे महाराष्ट्रात साचलेली घाण’, सोमय्या, पडळकरांच्या आंदोलनावर अमोल मिटकरींची तिखट शब्दात टीका

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.