AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात अग्नितांडव सुरुच, प्रसिद्ध रुग्णालयाच्या ICU ला भीषण आग, 3 रुग्णांचा होरपळून अंत

बिहारमधील मुझफ्फरपूर येथील प्रसाद रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या दुर्घटनेत ३ रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला असून रुग्णालयाच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

देशात अग्नितांडव सुरुच, प्रसिद्ध रुग्णालयाच्या ICU ला भीषण आग, 3 रुग्णांचा होरपळून अंत
hospital fire
| Updated on: Jun 04, 2026 | 8:16 AM
Share

बिहारमधील मुझफ्फरपूर येथून एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद घटना समोर आली आहे. ब्रह्मपुरा भागातील प्रसाद रुग्णालय (Prasad Hospital) च्या पाचव्या मजल्यावरील अतिदक्षता विभागाला (ICU) भीषण आग लागली. या दुर्घटनेत होरपळल्याने आणि धुरामुळे दम कोंडल्याने 3 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण शहरात तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.

शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण दाखल

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रसाद रुग्णालयाच्या आयसीयू (ICU) वॉर्डमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली. ही आग इतकी वेगाने पसरली की काही क्षणांतच संपूर्ण वॉर्डमध्ये काळोख आणि धूर पसरला. जिल्हाधिकारी सुब्रता कुमार सेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डची क्षमता १३ बेडची होती. मात्र या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त म्हणजेच १५ रुग्ण उपचार घेत होते. शॉर्ट सर्किट होताच रुग्णालयात एकच गोंधळ आणि पळापळ निर्माण झाली. अनेक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी कसाबसा जीव वाचवत बाहेर धाव घेतली. मात्र, आयसीयूमध्ये व्हेंटिलेटर आणि गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे ३ जणांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. ही आग लागली तेव्हा रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा (Fire Fighting System) पूर्णपणे बंद होती, ज्यामुळे आग वेळीच आटोक्यात आणता आली नाही, असा संताप नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ६ हून अधिक गाड्या आणि पोलीस प्रशासनाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच वॉर्डमध्ये अडकलेल्या रुग्णांना बाहेर काढले.

या दुर्घटनेत आयसीयू वॉर्डचे प्रभारी देखील गंभीररीत्या भाजले असून, त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उर्वरित सर्व रुग्णांना तातडीने जवळच्या इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे. या दुर्घटनेत सध्या ३ रुग्णांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी झाली आहे. संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. आयसीयूमध्ये प्रचंड धूर साचल्याने अनेक रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला असावा, अशी भीती आहे. आम्ही घटनेचा सखोल तपास करत असून लवकरच संपूर्ण तपशील समोर येईल, असे अग्निशमन दलाचे अधिकारी राम निवास पांडे यांनी सांगितले.

स्थानिक नागरिकांमध्ये संताप

या हृदयद्रावक घटनेनंतर रुग्णालयाबाहेर नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला. खासगी रुग्णालयांमध्ये सुरक्षा मानकांचे सर्रास उल्लंघन केले जातं आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच असे निष्पाप बळी जातात, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. रुग्णालय व्यवस्थापनाने आपण प्रशासनाला तपासात पूर्ण सहकार्य करत असल्याचे म्हटले असून, पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात