AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हरवलेल्या मुलांना शोधण्यासाठी आईबापाने जगावेगळा निर्णय घेतला, मुलं शोधली…

गुजरातमध्ये स्थायिक झालेले मूळच्या बिहार दाम्पत्याची जोरदार चर्चा होत आहे. या दोघांनी दोन मुलांना शोधण्यासाठी घेतलेल्या कृत्याची एकच चर्चा होत आहे.

हरवलेल्या मुलांना शोधण्यासाठी आईबापाने जगावेगळा निर्णय घेतला, मुलं शोधली...
gujarat newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 10, 2026 | 9:04 AM
Share

आई-वडील मुलांसाठी काहीही करायला तयार असतात. त्यासाठी दोघेही मागे पुढे बघत नाहीत. त्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली , तरी आई-वडील घाबरत नाहीत. असाच प्रकार गुजरातमधून समोर आलाय. गुजरातच्या कच्छ येथील मुंद्रा येथे मूळचे बिहारचं कुटुंब वास्तव्याला होतं. बिहारच्या या जोडप्याची दोन्ही मुले मागील दोन महिन्यांपासून बेपत्ता होती. आई-वडिलांनी त्यांचा शोध सर्वत्र घेतला. परंतु दोघेही सापडले नसल्याने त्यांनी शेवटी पोलिसांकडे मदत मागितली. पोलिसांनी शोधाशोध केल्यानंतरही दोघे जण सापडले नाहीत. अखेर मुलांना शोधण्यासाठी आई-वडिलांनी भिकाऱ्यांचा वेष धारण करत सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली. आई-वडिलांनी सलग काही महिने शोध घेतल्यानंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. या फिल्मी कहानीची जोरदार चर्चा होत आहे.

बिहारचं कुटुंब कामाच्या शोधात गुजरातमध्ये स्थलांतरित झालं होतं. बिहारच्या जोडप्याला दोन मुले होते. मोठ्या मुलाचं नाव राहुल (वय 14) होतं. तर छोट्या मुलाचं नाव अर्पित (वय 11) होते. वडिलांनी सांगितले की, दोघे भाऊ खेळण्यासाठी घराबाहेर पडले. परंतु त्या दिवशी घरी परतलेच नाही. दोघांनी त्यांच्या मुलांची खूप शोधाशोध केली. आजूबाजूचे लोक, मित्रमंडळींकडे शोधाशोध केली. परंतु दोघे कुठेच सापडले नाही. इतकी शोधाशोध करूनही त्यांच्या पदरी निराशा पडली. त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.

पोलिसांनी मुलांचा शोध सुरू केला. परंतु पोलिसांसोबत आई-वडिलांनी मुलांचा शोध घेण्याचे प्रयत्न सोडले नाहीत. सलग तीन महिने दोघेही मुले कुठेच सापडले नाही. दोघांना बिहारच्या भिकारी गँगच्या लोकांनी अपहरण केल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली. नोकरी, काम धंदा सोडून दोघांनी भिकाऱ्यांचं रुप धारण केलं. दोघे गुजरात, महाराष्ट्र, गोवा, राजस्थान, मध्यप्रदेशात रात्र-दिवस भटकत राहिले. दोन्ही मुले दिसतील, अशी अपेक्षा होतीच. शोधाशोध केल्यानंतर त्यांचा मोठा मुलगा बिहारच्या भिकारी गँगमध्ये सामील झाल्याचा दाट संशय आला. दोघांनी तातडीने भीक मागत भागलपूर गाठलं. दोघे दांपत्य भीक मागत असताना त्यांचा मोठा मुलगा भागलपूरमध्ये भीक मागताना दिसला. परंतु त्याने दोघांना पाहताच घटनास्थशळावरून पळ काढला. त्यानंतर दोघांनी पुन्हा मुलाचा शोध सुरू केला. पुढे त्यांचा मोठा मुलगा बिकारनेरमध्ये सापडला. पुढे 15 दिवसांनी छोट्या मुलाला पश्चिम बंगालमधून शोधून काढलं.

Follow Us
अरे हे काय घडलं? शिंदे गटाला मोठा धक्का... पक्षातील अनुभवी नेत्याचं...
अरे हे काय घडलं? शिंदे गटाला मोठा धक्का... पक्षातील अनुभवी नेत्याचं पद धोक्यात
‘मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली?’ रोहित पवारांचा MPSC ला
मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली? MPSC प्रकरणात नवा ट्विस्ट
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडीओ शेअर केला अन् आज...
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडिओ शेअर केला अन् आज...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...