AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cheating : अवघ्या 3 महिन्यात महिलेनं दोन बाळांना दिला जन्म! काय आहे प्रकरण?

बिहार(Bihar)मधल्या समस्तीपूर(Samastipur)मधून एक विचित्र प्रकरण समोर आलंय. एका आशा वर्करच्या संगनमतानं एका महिलेनं अवघ्या 3 महिन्यांत 12 दिवसांच्या अंतरानं दोनदा मुलांना जन्म दिलाय.

Cheating : अवघ्या 3 महिन्यात महिलेनं दोन बाळांना दिला जन्म! काय आहे प्रकरण?
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Dec 29, 2021 | 4:43 PM
Share

नवी दिल्ली : बिहार(Bihar)मधल्या समस्तीपूर(Samastipur)मधून एक विचित्र प्रकरण समोर आलंय. एका आशा वर्करच्या संगनमतानं एका महिलेनं अवघ्या 3 महिन्यांत 12 दिवसांच्या अंतरानं दोनदा मुलांना जन्म दिलाय. या फसवणुकीची माहितीही आरोग्य विभागाला नव्हती. महिलेनं दोन्ही वेळा मुलाला जन्म दिला.

योजनेचा लाभ घेण्यासाठी… मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण समस्तीपूरच्या उजियारपूर पीएचसीचं आहे. हरपूर रेबारी गावातील एका महिलेला दोन्ही वेळा उजियारपूर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तिथं तिची प्रसूती झाली. जननी बाल सुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेनं ही फसवणूक केली.

3 महिन्यांत 12 दिवसांच्या अंतरानं दोनदा जन्म माध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, 28 वर्षीय महिलेनं गावातील रहिवासी आशा रीता देवी यांच्या मदतीनं हा पराक्रम केला. रुग्णालयातील नोंदीनुसार, 24 जुलै रोजी तिला पहिल्यांदा उजियारपूर पीएचसीमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्याच दिवशी महिलेनं एका मुलालाही जन्म दिला. यानंतर, महिलेला पुन्हा 3 नोव्हेंबर रोजी उजियारपूर पीएचसीमध्ये प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं आणि 4 नोव्हेंबर रोजी तिनं एका मुलाला जन्म दिला. यानंतर महिलेला डिस्चार्ज देण्यात आला.

प्रसूतीचा रेकॉर्ड तयार करताना फसवणूक उघड उजियारपूर पीएचसीमध्ये जननी बाल सुरक्षा योजनेसाठी नोव्हेंबर महिन्यात प्रसूतीचा रेकॉर्ड तयार करण्यात येत होता. यादरम्यान ही बाब उघडकीस आली. या महिलेची 24 जुलै रोजी प्रसूतीही झाल्याचं रेकॉर्डमध्ये आढळून आलं. त्यासाठी त्यांना जननी बाल सुरक्षा योजनेंतर्गत प्रोत्साहनपर रक्कमही मिळाली होती. ही बाब उघडकीस येताच रुग्णालय प्रशासनानं वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.

Viral Video : अय्यो…! वरमाला घालण्यापूर्वी वरानं घातली ‘अशी’ अट, की वधूही लाजली!

नीतेश यांना पाताळातून शोधू, राणेंनी पोलिसांना सहकार्य करावे, राऊत आक्रमक; एका राज्याच्या मुख्यमंत्र्याने लपवले असेल तर…

Accident | ट्रकच्या चाकाखाली महिला चिरडल्या, हिंगोली-नांदेड मार्गावर भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढणार?

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.