Viral Video : अय्यो…! वरमाला घालण्यापूर्वी वरानं घातली ‘अशी’ अट, की वधूही लाजली!

Viral Video : अय्यो...! वरमाला घालण्यापूर्वी वरानं घातली 'अशी' अट, की वधूही लाजली!
Viral

सोशल मीडिया(Social Media)च्या दुनियेत लग्नाशी संबंधित व्हिडिओ नेहमीच व्हायरल (Viral) होत असतात. वधू-वरांचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर witty_wedding नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलाय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रदीप गरड

Dec 29, 2021 | 4:20 PM

सोशल मीडिया(Social Media)च्या दुनियेत लग्नाशी संबंधित व्हिडिओ नेहमीच व्हायरल (Viral) होत असतात. सोशल मीडियावर वधू-वरांशी संबंधित व्हिडिओ सर्वात जास्त पाहिले जातात. त्यामुळे असा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर केला की लगेच तो व्हायरल होतो. या एपिसोडमध्ये आता एका खोडकर वराचा व्हिडिओ व्हायरल होतोय. मुलगा हार घालण्यापूर्वी वधूसमोर अशी अट ठेवतो, हे ऐकून वधू लाजते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही हसाल.

टाकली ‘ही’ अट व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की वधू आणि वर लग्न सोहळ्यासाठी स्टेजवर उभे आहेत. वधूनं मुलाला हार घातला, आता वराची पाळी आहे. पण पुढे काय झालं? वरानं हारही घातलेला नाही. तो वधूसमोर एक अट ठेवतो, हे ऐकून वधू लाजते. वरानं वधूला हार घालण्यापूर्वी त्याचं चुंबन घ्यायला सांगितलं. मात्र एवढ्या लोकांसमोर कसं चुंबन घेणार, त्यामुळे ती लाजते. वर मात्र काहीही ऐकायला तयार होत नाही. शेवटी वधूला त्याचं चुंबन घ्यावं लागतं. त्यानंतरच वर तिला हार घालतो. चला पाहू या हा व्हिडिओ…

सोशल मीडियावर धुमाकूळ वधू-वरांचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर witty_wedding नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलाय. युझरनं कॅप्शनमध्ये लिहिलंय, की My varmala with a twist! जेव्हा तू तुझ्या कॉलेजच्या काळातल्या प्रेमासोबत लग्न करतेयस.’ काही तासांपूर्वी अपलोड केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. हा व्हिडिओ अनेकांना आवडलाय. 14 हजारांहून अधिक लाइक्स आणि व्ह्यूज मिळालेत.

VIDEO : मैं तो आपनी मस्ती मे!, कुत्र्याचा बर्फामध्ये मस्ती करत असतानाचा सुपर क्युट व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल, पाहा व्हिडीओ!

VIDEO : जिना आणि छत पाहून नेटिझन्सची सटकली, म्हणतात, कोरोना काळातील ऑनलाईन क्लासचा परिणाम दिसतोय

VIDEO : मांजर आणि उंदरामधली अशी मैत्री तुम्ही कधीही पाहिली नसेल, पाहा खास व्हिडीओ!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें