VIDEO : जिना आणि छत पाहून नेटिझन्सची सटकली, म्हणतात, कोरोना काळातील ऑनलाईन क्लासचा परिणाम दिसतोय

VIDEO : जिना आणि छत पाहून नेटिझन्सची सटकली, म्हणतात, कोरोना काळातील ऑनलाईन क्लासचा परिणाम दिसतोय
व्हायरल व्हिडीओ

एक छान आपल स्वत: चं घर असाव हे जवळपास सर्वांचेच स्वप्न असते. मात्र, मोठ्या शहरामध्ये घर बांधणे हे एक मोठे आव्हानच आहे. कारण शहरांमध्ये मोकळी जागा भेटणे खूप कठिण झाले आहे. जरी जागा भेटली तरी घर बांधायला खूप पैसे लागतात. यामुळे शक्यतो शहरामध्ये लोक फ्लॅट खरेदी करतात.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Dec 29, 2021 | 11:16 AM

मुंबई : एक छान आपल स्वत: चं घर असाव हे जवळपास सर्वांचेच स्वप्न असते. मात्र, मोठ्या शहरामध्ये घर बांधणे हे एक मोठे आव्हानच आहे. कारण शहरांमध्ये मोकळी जागा भेटणे खूप कठिण झाले आहे. जरी जागा भेटली तरी घर बांधायला खूप पैसे लागतात. यामुळे शक्यतो शहरामध्ये लोक फ्लॅट खरेदी करतात. ज्यांच्याकडे तत्काळ पैसे नाहीत, ते घराचे हप्ते EMI मध्ये भरत राहतात.

घर बांधताना झाली मोठी चूक

आजही घर बांधण्याचे प्रमाण जास्त आहे. मात्र विचार करा की, जर तुम्ही तुमच्या आयुष्यभराच्या कमाईने घराचे बांधकाम सुरू केले आणि मिस्त्रीने तुमचे घर उलट्या पद्धतीने बांधले तर काय होईल. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मिस्त्रीच्या चुकीमुळे मोठे नुकसान झाले आहे. चला तर बघूयात या व्हिडीओमध्ये नेमके काय आहे. मिस्त्रीने घराचे छत आणि पायऱ्या चुकीच्या पध्दतीने बांधल्या आहेत. तुम्ही सरळ उभे होऊन पायऱ्या चढू शकत नाहीत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एका घराचे बांधकाम सुरू आहे. ज्याच्या आत पायऱ्या बनवण्यात आल्या आहेत. पण पायऱ्यावर छत आला आहे. त्यामुळे कोणीही पायऱ्यावरून छतावर सरळ उभे राहून जाऊ शकत नाही. हा व्हिडीओ बघितल्यावर लोक त्या इंजिनिअरची खिल्ली उडवत आहेत. ज्याने घराचा प्लॅन तयार केला आहे.

लोकांनी उडवली इंजिनिअरची खिल्ली

हा मजेदार व्हिडिओ camera.wala_ ने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, कोरोनाच्या काळात ऑनलाइन अभ्यास करून सिव्हिल इंजिनीअरिंगची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर असे होते. आतापर्यंत या व्हिडिओला 50 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तर 1 लाखांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे. त्याचबरोबर अनेकांनी मजेशीर कमेंट्स करत इंजिनिअरची खिल्लीही उडवली आहे.

संबंधित बातम्या : 

VIDEO : मांजर आणि उंदरामधली अशी मैत्री तुम्ही कधीही पाहिली नसेल, पाहा खास व्हिडीओ!

सोशल मीडियावर अनोख्या डिझाईनचा शूज, व्हिडीओ पाहून सर्वच आश्चर्यचकित!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें