सोशल मीडियावर अनोख्या डिझाईनचा शूज, व्हिडीओ पाहून सर्वच आश्चर्यचकित!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Dec 28, 2021 | 3:52 PM

अनेकदा अनेकजण केवळ लोकांच्या मनोरंजनासाठी तर कधी टाईमपास म्हणून व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर टाकत असतात. यातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही आश्चर्यचकित तर व्हालच, सोबतच तुम्ही पोट धरुन हसालही.

सोशल मीडियावर अनोख्या डिझाईनचा शूज, व्हिडीओ पाहून सर्वच आश्चर्यचकित!

मुंबई : इंटरनेटच्या (Internet) जगात अनेक मजेशीर व्हिडीओ (Funny Video) तुम्हाला पाहायला मिळत असतात. अनेकदा अनेकजण केवळ लोकांच्या मनोरंजनासाठी तर कधी टाईमपास म्हणून व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर टाकत असतात. यातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही आश्चर्यचकित तर व्हालच, सोबतच तुम्ही पोट धरुन हसालही.

आपण सर्व जाणतो की आजकाल तरुणांमध्ये शूजबाबत एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. त्यामुळेच आज मार्केटमध्ये हजारो-लाखो रुपयांचे शूज उपलब्ध आहेत. अनेकदा शूजचं डिझाईन यूनिक असतं. तर अनेक शूज प्रिमियम आणि लिमिटेड एडिशनचे असतात. एक असाच लिमिटेड एडिशनच्या शूजचं डिझाईन या दिवसात मार्केटमध्ये आलं आहे.

पाहा आणि पोट धरुन हसा

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती पार्ट वेअर शूजबाबत सांगत असतो. तो हे शूर्ज पार्टी वेअर असल्याचं सांगत, ते खूप महान असल्याचं सांगतो. त्यानंतर तो व्यक्ती त्या शूजची डिझाईन दाखवतो. या व्हिडीओच्या शेवटी असं काही होतं की तुम्ही हसू आवरू शकत नाहीत. कारण या व्हिडीओच्या शेवटी तुमच्या लक्षात येतं की तो शूट फाटलेला असतो आणि त्या व्यक्तीने पायात चप्पल घातलेली असते. तर शूजचं केवळ कव्हर चढवलेलं असतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhutni_ke (@bhutni_ke_memes)

व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स

सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडीओ यूजर्सकडून शेअर केले जातात. त्यावर लोक आपल्या अंदाजात खास कमेंट्सही करत असतात. एका यूजरने व्हिडीओवर कमेंट करत म्हटलं आहे की, ‘कुणी सांगू शकतं का की हे शूज कुठल्या बाजारात मिळतील आणि किंमत किती आहे?’ तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट करत म्हटलं आहे की, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर हसू कंट्रोल करु शकत नाही. त्याचबरोबर हे शूज घालून पार्टीमध्ये जाऊ शकतो का? असा सवालही एका यूजरने केला आहे.

इतर बातम्या :

Rajesh Khanna |  ‘बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार’ राजेश खन्ना यांचा बायोपिक बनणार! फराह खान सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा!

‘मॉनिटर’ हर्षद नायबळ आता झळकणार मालिकेत! ‘पिंकीचा विजय असो’मध्ये साकारणार ‘दिप्या’ची व्यक्तिरेखा

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI