काय सांगता? शेतात अचानक मगरीची एन्ट्री, शेतकऱ्याने थेट खांद्यावर उचलली अन् पोलीस ठाण्यात पोहोचला, VIDEO व्हायरल

viral video : बिहारमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका शेतकऱ्याने मगरीला पकडून थेट पोलीस ठाण्यात नेलं. व्हिडिओ व्हायरल होत आहे.

काय सांगता? शेतात अचानक मगरीची एन्ट्री, शेतकऱ्याने थेट खांद्यावर उचलली अन् पोलीस ठाण्यात पोहोचला, VIDEO व्हायरल
| Updated on: Aug 02, 2026 | 11:22 AM

बिहारच्या सुपौल जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका शेतकऱ्याच्या शेतात अचानक मगरीची एन्ट्री झाली. शेतात काम असताना तरुण शेतकऱ्याला ही मगर दिसली. त्यानंतर त्याने ही मगर खांद्यावर घेऊन पोलीस स्टेशन गाठलं. या मगरीला पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली. या मगरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बिहारच्या भीमनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लालपूर वॉर्ड 14 मधील हा प्रकार आहे. तरुण शेतककऱ्याला ही मगर दिसली. त्याने काही वेळ मगरीची हालचाल पाहिली. त्यानंतर मगरीला त्रास न देता पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु सुरुवातीला मगर त्याच्या हाती लागत नव्हती. त्यानंतर त्याने मगरीच्या तोंडाला एका दोरीने बांधलं. पुढे काही वेळात या मगरीला पकडलं.

नेमकं काय घडलं?

अमित कुमार यांच्या माहितीनुसार, तो शेतात (Farm) काम करत होता. त्यावेळी एका मगरीवर नजर पडली. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने मगरीला पकडलं. सुरुवातील मगरीचं तोंड बांधून घेतलं. त्यानंतर खांद्यावर उचलून तरुण निघाला. रस्त्यावरून चालताना अनेक जण अमित कुमार यांना पाहतच राहिले. अमित कुमार मगरीला घेऊन थेट वनविभागाच्या कार्यालयात पोहोचला. परंतु तिथे वनविभागाचे कर्मचारी नव्हते. त्यामुळे अमित मगरीला घेऊन थेट पोलीस ठाण्यात पोहोचला. मगरीला पोलीस ठाण्यात आणल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर त्यांनी तातडीने वनविभागाला माहिती दिली. पुढील काही वेळात वनविभागाचे कर्माचारी पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी मगरीला ताब्यात घेतले. नंतर नदीत सोडून दिले. अमितने धाडस दाखवून मगरीला पकडले. त्याच्या धाडसाचं कौतुक होत आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral)  होत आहे.

वन विभागाच्या कर्मचाऱ्याने सांगितलं की, अमितने पकडलेली मगर (crocodile) ही 5 फुटांची आहे. ती पूर्णपणे व्यवस्थित आहे. पावसाळ्यात नदीतील पाणीपातळीत वाढ होते. त्यामुळे मगर आणि इतर काही प्राणी हे नैसर्गिक अधिवासातून इतरत्र स्थलांतर करतात. काही वेळा हे प्राणी मानवी वस्तीतही पोहोचतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us