AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिश्नोईला बाहेर काढून फटकावला पाहिजे, राज ठाकरे यांनी केली मागणी

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पत्रकार परिषदेत टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार करणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई याच्याविषयी वक्तव्य केले आहे. राज ठाकरे यावेळी म्हणाले की तुम्ही काय त्याला पोसत आहात का ?

बिश्नोईला बाहेर काढून फटकावला पाहिजे, राज ठाकरे यांनी केली मागणी
raj thackeray news
| Updated on: Oct 21, 2026 | 6:45 PM
Share

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पत्रकार परिषदेत टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार करणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई याच्याविषयी वक्तव्य केले आहे. साबरमती तुरुंगात असलेला लॉरेन्स बिश्नोई हा गुंड जगभरात अशा प्रकारचे हल्ले करत असल्याच्या संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता मनसेचे नेते राज ठाकरे म्हणाले की अशा व्यक्तीला जेलमधून बाहेर काढून सर्वांसमोर नागडा करुन फटकवला पाहिजे. मुंबई पोलिसांवर माझा एक लाख टक्के विश्वास आहे. त्यांना जर फ्री हँड दिले तर गुन्हेगारांपासून ते मुंबईला नक्कीच मुक्त करतील असेही ते यावेळी म्हणाले.

साबरमती जेलमध्ये बिश्नोईला ठेवलेले आहे. त्याला कोणाला भेटू दिले जात नाही असा सवाल ज्यावेळी पत्रकारांनी केला असता राज ठाकरे म्हणाले, की या क्षणी मला ते गाणे आठवतेय ‘साबरमती के संत तुने कर दिया कमाल’.  राज ठाकरे पुढे म्हणाले की, ‘मुंबईतील सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झालेला आहे. हिच परिस्थिती भाजपा विरोधी पक्षात असताना झाली असती तर ते काय बोलले असते?. घटना तिच विरोधी पक्षात असताना आमची भूमिका वेगळी असे कसे चालेल. त्याला जेलमधून बाहेर काढून नागडा फटकवला पाहिजे. नाहीतर कशी हिंमत होईल, तुम्ही काय त्याला पोसता आहात काय ? असाही सवाल त्यांनी केला आहे.

आपल्याकडे लॉ आहे पण, ऑर्डर नाही. माझा मुंबई आणि महाराष्ट्रातील पोलिसांवर शंभर टक्के विश्वास आहे. हवे तर एक लाख टक्के विश्वास आहे म्हणा. त्यांना फ्री हँड दिला तर ते झीरो परसेंट क्राईम रेंट आणतील. त्यांना सगळ्यांची अंडीपिल्ली माहिती आहेत. त्यांच्यावर राजकीय हस्तक्षेप दूर करा. त्यानंतर पाहा काय होते असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

इतकी आंदोलने सुरु आहेत. तरीही ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेण्याचा सरकारचा निर्णय काही दिसत नाही याबद्दल विचारले असता राज ठाकरे म्हणाले की ही आंदोलने आता होत राहणार आहेत आणि आणखीन वाढत जातील असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

२०१४ ची सत्ता नरेंद्र मोदी यांच्यामुळे आलेली

आरआरएसच्या सरसंघचालक यांनी आंदोलन करणे योग्य आहे, मात्र, त्याला राजकीय पार्श्वभूमी नको अशी मागणी केली आहे, यावर विचारले असता राज ठाकरे म्हणाले की साल २०१४ मध्ये आलेली सत्ता नरेंद्र मोदी यांच्यामुळे आलेली आहे. येथील जनता आणि मोदी आता ठरवणार कोणाची सत्ता येणार आहे. सत्ता आल्यानंतर ती आम्ही आणली असा कोणाचा गैरसमज असेल तर तो चुकीचा आहे असेही राज ठाकरे म्हणाले.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?