Video : आमदाराच्या गाडीनं भाजप कार्यकर्त्यांना चिरडलं, लोकांनी आमदारालाही जखमी होईपर्यंत मारलं

| Updated on: Mar 12, 2022 | 5:16 PM

ओडिशातील (Odisha) निलंबित बीजेडी आमदारानं (BJD MLA) लोकांच्या अंगावर गाडी घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रशांत जगदेव (Prashant Jagdev) असं त्या निलंबित आमदाराचं नाव आहे.

Video : आमदाराच्या गाडीनं भाजप कार्यकर्त्यांना चिरडलं, लोकांनी आमदारालाही जखमी होईपर्यंत मारलं
निलंबित आमदारानं जमावावर गाडी घातली
Image Credit source: ANI
Follow us on

भूवनेश्वर : ओडिशातील (Odisha) निलंबित बीजेडी आमदारानं (BJD MLA) लोकांच्या अंगावर गाडी घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रशांत जगदेव (Prashant Jagdev) असं त्या निलंबित आमदाराचं नाव आहे. ओडिशातील खूर्दा जिल्ह्यातील बांधपूर तालुक्यात ही घटना घडलीय. स्थानिक निवडणुकीच्या मतदानासाठी जमलेल्या लोकांवर आमदारानं गाडी घातली आहे. आमदारानं गाडी घातल्यामुळं 20 ते 22 लोक जखमी झाले असून त्यात 7 पोलिसांचा समावेश आहे. आमदारानं लोकांवर गाडी घातल्यान लोकं आक्रमक झाली. लोकांनी यानंतर संबंधित आमदाराच्या गाडीवर हल्ला केला. लोकांनी त्या आमदाराला देखील जमावानं मारहाण केली आहे. या मध्ये तो आमदार देखील जखमी झाला आहे. लोकांनी आमदाराच्या गाडीची तोडफोड केली असून गाडी पलटी देखील केली आहे. आता आमदारावर स्थानिक प्रशासन काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे. मात्र, या घटनेमुळं ओडिशातील खूर्दा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पाहा व्हिडीओ :

भाजपकडून टीका

बीजेडीच्या निलंबित आमदाराकडून लोकांवर गाडी घालण्यात आल्यानंतर भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे. बीजेडी आमदाराकडून ताकदी आणि उर्मटपणा कसा असतो हे दाखवल्याचं ललितेंदून महापात्रा यांनी म्हटलंय. प्रशांत जगदेव यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपकूडन करण्यात आली आहे.

प्रशांत जगदेव यांना बीजेडीतून गेल्या वर्षी निलंबित करण्यात आलं होतं. भाजपकडून आता प्रशांत जगदेव यांच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे. प्रशांत जगदेव यांच्या विरोधात आंदोलन करणारे लोक हे भाजपचे कार्यकर्ते असल्याची प्राथमिक माहिती आहे.

इतर बातम्या:

VIDEO : रोहित शर्मा बाद होताच स्टेडियममध्ये जल्लोष; प्रेक्षकांनी टाळ्या, शिट्ट्यांनी मैदान दणाणून सोडलं, पण का?

अधीर रंजन चौधरी म्हणाले ममता बॅनर्जी ‘पागल’! देशभरात काँग्रेसचे 700 आमदार असल्याचंही आवर्जून सांगितलं