उन्नाव बलात्कार : आमदार कुलदीप सेंगरला आजन्म कारावास

सेंगर हा घरातील एकुलता कमवणारा आहे. त्याने स्वत:च्या लेकीच्या फीसाठी कर्ज घेतलं होतं, असा शिक्षेसाठी युक्तिवाद सेंगरच्या वकिलांनी केला होता.

Kuldeep Sengar life imprisonment, उन्नाव बलात्कार : आमदार कुलदीप सेंगरला आजन्म कारावास

नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेला आमदार कुलदीप सेंगरला आजन्म कारावासाची शिक्षा (Kuldeep Sengar life imprisonment) सुनावण्यात आली आहे. दिल्लीतील तीस हजारी कोर्टाने सेंगरला मरेपर्यंत गजाआड ठेवण्याची शिक्षा ठोठावली. शिक्षा ऐकून दोषी सेंगर कोर्टातच नक्राश्रू ढाळत होता.

सेंगर हा घरातील एकुलता कमवणारा आहे. त्याने स्वत:च्या लेकीच्या फीसाठी कर्ज घेतलं होतं, असा शिक्षेसाठी युक्तिवाद सेंगरच्या वकिलांनी केला होता. मात्र, कोर्टाने भादंवि 376 (ब) नुसार कुलदीप सेंगरला नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत उर्वरित आयुष्यासाठी कारावासाची शिक्षा सुनावली.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेश शर्मा यांनी सेंगरला पीडितेला दहा लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. पीडिता आणि तिच्या कुटुंबाच्या जीविताला संभाव्य धोका असल्याचं लक्षात घेऊन त्यांना सुरक्षा पुरवण्याचे आदेशही सीबीआयला देण्यात आले आहेत.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये 2017 मध्ये त्यावेळी अल्पवयीन असलेल्या तरुणीचं अपहरण करुन सेंगरने लैंगिक अत्याचार केले होते. चार वेळा आमदार असलेल्या कुलदीपसिंह सेंगर याची ऑगस्ट महिन्यात भाजपने पक्षातून हकालपट्टी केली होती. कोर्टाने या प्रकरणातील अन्य आरोपी शशी सिंग याला निर्दोष सोडलं आहे.

कलम 120 ब (गुन्हेगारी कट रचणे), 363 (अपहरण), 366 (लग्नास उद्युक्त करण्यासाठी एखाद्या महिलेचे अपहरण), 376 (बलात्कार) आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण कायद्याशी (पोक्सो) संबंधित इतर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार लखनौ येथील कोर्टाकडून ही केस दिल्लीला वर्ग करण्यात आल्यानंतर न्यायाधीशांनी ऑगस्टपासून या खटल्याची नियमित सुनावणी केली.

जुलैमध्ये फिर्यादी तरुणीच्या कारला भीषण अपघात झाला होता. यामध्ये बलात्काराच्या प्रकरणातील महत्त्वपूर्ण साक्षीदार असलेली तिची मावशी मृत्युमुखी पडली होती, तर फिर्यादी तरुणी, तिची दुसरी मावशी आणि तरुणीचा वकील गंभीर जखमी झाले होते. कार दुर्घटनेमागे सेंगर असल्याचा आरोप तिच्या कुटुंबाने केला होता.

उन्नाव बलात्कार पीडितेचा कार अपघात, भाजप आमदार सेनगर यांच्यासह 25 जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल

एप्रिल 2018 मध्ये तरुणीच्या वडिलांना बेकायदा शस्त्रास्त्र प्रकरणात अटक करण्यात आली होती. काही दिवसांनी त्यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. त्यानंतर सेंगर, त्याचा भाऊ आणि इतर नऊ जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Kuldeep Sengar life imprisonment

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *