भाजपाच्या बड्या नेत्याने तरुणाला थेट कानशिलात लगावली, भर रस्त्यात सर्वांसमोर फटकारले, Video Viral
भाजप आमदाराने एका दुकानदाराच्या कानशिलात मारल्याच्या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. घटनास्थळी असलेल्या वाहनात हरभरा बियाण्यांच्या अंदाजे १०० गोण्या होत्या, असेही समोर आले आहे.

उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील चरखारीचे भाजप आमदार ब्रिजभूषण राजपूत पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. शेतकऱ्यांसाठी असलेल्या हरभऱ्याच्या बियाण्यांचा कथित काळाबाजार होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, आमदार कृषी विभागाच्या बियाणे गोदामात पोहोचले आणि गोदाम प्रभारी सोनू यादव यांच्याशी त्यांचा वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि आमदारांनी गोदाम प्रभारीला कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार ब्रिजभूषण राजपूत यांना माहिती मिळाली की, शेतकऱ्यांसाठी असलेले हरभऱ्याचे बियाणे गोदामातून नेले जात आहे. या माहितीच्या आधारे ते चरखारी येथील कृषी विभागाच्या बियाणे गोदामात गेले. तिथे त्यांना हरभऱ्याच्या बियाण्यांनी भरलेली सुमारे १०० पोती असलेले एक वाहन आढळले. आमदारांनी आरोप केला की, शेतकऱ्यांमध्ये वाटप करण्यासाठी असलेले बियाणे त्यांच्यामध्ये वाटण्याऐवजी बाजारात विकले जात आहे.
महोबा में BJP विधायक ब्रज भूषण राजपूत पर सरकारी कर्मचारी को थप्पड़ मारने का आरोप
#Mahoba #BrajBhushanRajput #BJP #UttarPradesh #ViralVideo https://t.co/duvITnDUt7
— Priyanshi Singh (@Priyanshi9935) October 22, 2026
जागीच आमदारांनी गोदाम प्रभारी सोनू यादव यांना बियाण्यांच्या पोत्यांबद्दल जाब विचारला. वाद विकोपाला गेला आणि आमदाराने गोदामाच्या प्रभारीला कानशिलात लगावली. आमदाराने गोदामाच्या प्रभारीवर शेतकऱ्यांच्या बियाण्यांच्या वाट्याचा अपहार केल्याचा आरोप केला. त्यांनी समाजवादी पक्ष आणि अखिलेश यादव यांच्यासोबतच्या त्याच्या संबंधांवरही भाष्य केले.
बृजभूषण राजपूत यापूर्वी एका वादग्रस्त कृतीमुळे चर्चेत आले होते. त्यांनी पीक विमा सर्वेक्षकांना घागरा-चोली आणि पेटीकोट घालायला लावल्याचा आरोप आहे. आता, बियाणे गोदामाच्या प्रभारीला कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, आमदार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.
भाजप आमदार काय म्हणाले…
या संपूर्ण प्रकरणाबाबत भाजप आमदार म्हणाले, “शासकीय बियाणे बियाणे गोदामातून वितरित केले जाते. तिथे काळाबाजार होत असल्याची माहिती आम्हाला मिळाली. हरभऱ्याची १०० पोती वाहनांमध्ये भरली जात होती. कोणाच्या आदेशानुसार ते हे पाठवत आहेत, असे आम्ही विचारले असता, त्यांच्याकडे असे कोणतेही आदेश नसल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही त्यांच्या वरिष्ठांना विचारले असता, त्यांच्याकडेही असे कोणतेही आदेश नसल्याचे त्यांनी सांगितले.”
महोबाच्या चरखारी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार ब्रिजभूषण राजपूत हे यापूर्वीही त्यांच्या वादग्रस्त कार्यपद्धतीमुळे चर्चेत राहिले आहेत. पीक विमा योजनेच्या सर्वेक्षणातील कथित अनियमिततेवरून त्यांनी यापूर्वी सर्वेक्षकांविरुद्ध एका अनोख्या पद्धतीने आंदोलन केले होते.
