AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परिणीती चोप्रा हिचा पती थेट म्हणाला, पिक्चर बाकी है… राघव चड्ढाचे आपच्या नेत्यांना प्रत्युत्तर..

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा कायमच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. परिणीती चोप्रा हिचा पती आणि खासदार राघव चड्ढा आम आदमी पार्टीसोबतच्या वादामुळे चर्चेत आहे. सतत गंभीर आरोप केली जात आहेत.

परिणीती चोप्रा हिचा पती थेट म्हणाला, पिक्चर बाकी है... राघव चड्ढाचे आपच्या नेत्यांना प्रत्युत्तर..
arineeti Chopra and Raghav Chadha
| Updated on: Apr 05, 2026 | 1:23 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा सध्या तूफान चर्चेत आहेत. राघव चड्ढा आणि आम आदमी पार्टी यांच्यातील मतभेद पुढे आले. थेटपणे व्हिडीओ तयार करून आपल्याच पार्टीविरोधात बोलताना राघव चड्ढा दिसले. त्यांनी पक्षावर अनेक आरोप केली. त्यामध्येच सातत्याने त्यांच्याकडून विविध व्हिडीओ तयार करून काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आम आदमी पक्षातील इतर लोकही थेट राघव चड्ढा विरोधात भूमिका घेताना दिसत आहेत. हे प्रकरण चांगलेच तापलेले असतानाच आता पुन्हा एकदा राघव यांनी पंजाबच्या मुद्द्यावर केलेल्या आरोपांवर प्रतिउत्तर देणारा व्हिडीओ शेअर केला. आता हा वाद अधिक टोकाला जाताना दिसत आहे. कोणीही थांबण्याचे नाव घेत नाही.

यादरम्यान राघव चड्ढा यांनी खास व्हिडीओ शेअर केला. त्यांनी व्हिडीओ शेअर करत लिहिले की, माझ्या आम आदमी पार्टीच्या सहकाऱ्यांसाठी… ज्यांना राघव चड्ढा संसदेत पंजाबचे प्रश्न मांडण्यात अपयशी ठरल्याची तक्रार करणारा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यास भाग पाडले गेले, हा एक छोटा ट्रेलर आहे. अजून खरे पुढे येणे शिल्लकच आहे.

त्यांनी पुढे लिहिले की, पंजाब माझ्यासाठी फक्त एक चर्चेचा विषय नाही.. ते माझे घर… ते माझे कर्तव्य आहे… माझी माती.. माझा आत्मा आहे. व्हिडीओमध्ये राघव चड्ढा पंजाबमध्ये जमिनीवर उतरून काम करताना दिसत आहेत. यादरम्यान त्यांनी पंजाबमध्ये नक्की काय काय काम केले आणि लोकांच्या समस्या कशा जाणून घेतल्या हे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

व्हिडिओमध्ये राघव चड्ढा यांनी एमएसपीच्या कायदेशीर हमीची मागणी, पंजाबमधील पाण्याची टंचाई, शेतकऱ्यांच्या विविध मागण्या, पंजाबमधील घटणारे भूजल, शहीद भगत सिंग यांना भारतरत्न देण्याची मागणी, नदी पुनरुज्जीवन आणि पंजाबला पाणीपुरवठा, महाराजा रणजीत सिंग यांना राजगादी देण्याची मागणी या मुद्द्यांचाही उल्लेख केला, आता राघव चड्ढा यांनी शेअर केलेली ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसतंय. यावर आम आदमी पार्टीकडून नक्की काय उत्तर देते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा