AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

By Election 2021 Results: हिमाचलमधील दणदणीत पराभव ही भाजपसाठी धोक्याची घंटा; काँग्रेसचा उत्साह वाढला

काँग्रेसने अपेक्षेपेक्षा चांगले प्रदर्शन केले, मात्र भाजपासाठी कालचे निकाल चिंता वाढवणारे ठरले. हिमाचलमधील दणदणीत पराभव ही भाजपसाठी धोक्याची घंटा आहे, तर काँग्रेससाठी 2022 च्या निवडणुकीपूर्वी ती प्रोत्साहनाची घंटा मानली जात आहे.

By Election 2021 Results: हिमाचलमधील दणदणीत पराभव ही भाजपसाठी धोक्याची घंटा; काँग्रेसचा उत्साह वाढला
| Edited By: sagar joshi | Updated on: Aug 10, 2022 | 4:02 PM
Share

देशातील 3 लोकसभा आणि 29 विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकींचा काल निकाल लागला. या निकालानंतर अनेक राजकीय संदेश मिळतात आणि जनतेचा कौल कुठे आहे त्याचा अंदाज येतोय. 2022 मध्ये होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांपूर्वी आलेल्या या निकालानी राजकीय पक्षांच्या हृदयाचे ठोके वाढवले ​​आहेत. पोटनिवडणुकीत ज्या पक्षाची राज्यात सत्ता आहे त्यांना फायदा होण्याचा ट्रेंड दिसला. कालच्या निकालात राजकीय प्रादेशीक पक्षपण आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यात यशस्वी ठरले आहेत. काँग्रेसने अपेक्षेपेक्षा चांगले प्रदर्शन केले, मात्र भाजपासाठी कालचे निकाल चिंता वाढवणारे ठरले. हिमाचलमधील दणदणीत पराभव ही भाजपसाठी धोक्याची घंटा आहे, तर काँग्रेससाठी 2022 च्या निवडणुकीपूर्वी ती प्रोत्साहनाची घंटा मानली जात आहे. (By elections result Bjp lost in himachal pradesh is a worry ahead of 2022, elections congress wins)

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला धोका

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आहे. हिमाचलमधील लोकसभेच्या मंडी जागेवर आणि विधानसभेच्या तीन जागांच्या पोटनिवडणुका झाल्या होत्या. या चारही जागा काँग्रेसने जिंकल्या. मंडी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली होती. हिमाचलमधील पराभवामुळे भाजपमध्ये चिंतेची लाट पसरली आहे.

जुब्बल-कोटखाईजागेवर भाजपला डिपॉझीट पण वाचवता आलेला नाही इतके कमी मतं मिळाली. हिमाचलचे हे निकाल भाजपसाठीही अडचणीचे ठरणार आहेत कारण पुढील वर्षाच्या शेवटी राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि ही पोटनिवडणुक 2022 ची सेमीफायल मानली जात होती. अशा स्थितीत पोटनिवडणुकीचे हे निकाल काँग्रेससाठी टॉनिक ठरू शकतात. इतकेच नाही तर माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नीचा निवडणूक जिंकणे हिमाचलमध्ये काँग्रेससाठी उत्साह वाढवणारे आहे.

सत्तेची जागा कोणाची

पोटनिवडणुकीच्या निकालाने हेही स्पष्ट केले आहे की, ज्या राज्यात जो पक्ष सत्तेत आहे, त्यानेच पोटनिवडणुकीचीही जागा जिंकली. उदाहरणार्थ, आसाममध्ये भाजपचे सरकार आणि भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी तिथल्या पाचही विधानसभा जागा जिंकल्या. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार आहे आणि दोन्ही जागा काँग्रेसने काबीज केल्या. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार आहे आणि ममता यांच्या पक्षाने तिथल्या चारही विधानसभा जागांवर पोटनिवडणूक जिंकली. मात्र, हिमाचलही याला अपवाद ठरले. हिमाचलमध्ये भाजपचे सरकार आहे, पण तिथल्या तीनही विधानसभा जागा काँग्रेसने जिंकल्या.

हरियाणातील शेतकरी आंदोलनाचा परिणाम

याच वर्षी हरियाणातील एलेनाबाद विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली होती. इंडियन नॅशनल लोकदलाचे अभय चौटाला येथे आमदार होते आणि त्यांनी कृषी कायद्याच्या निषे म्हणून जानेवारीत राजीनामा दिला होता. पोटनिवडणुकीत अभय सिंह पुन्हा विजयी झाले. राकेश टिकैत आणि गुरनाम सिंह चदुनी या शेतकरी नेत्यांनी येथे येऊन भाजपला विरोध केला होता. त्याचा परिणाम येथेही दिसून आला असावा.

Related News

दादरा नगर हवेलीवर सेनेचा भगवा, कलाबेन डेलकर यांची विजयी डरकाळी, शुभेच्छा देताना दरेकरांकडून टोले आणि टोमणे

By Election 2021 Result : 13 राज्यात विधानसभेच्या 29 जागांसाठी पोटनिवडणुका, कोणाचा विजय कोण पराभूत ? पूर्ण यादी

UP Elections 2022: का अखिलेश यादव निवडणूक लढवणार नाहीत? काय आहे फॉर्म्युला?

By elections result Bjp lost in himachal pradesh is a worry ahead of 2022 elections congress wins

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ