AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

By Election 2021 Result : 13 राज्यात विधानसभेच्या 29 जागांसाठी पोटनिवडणुका, कोणाचा विजय कोण पराभूत ? पूर्ण यादी

महाराष्ट्रासह देशभरातील 13 राज्यात विधानसभेच्या 29 जागांसाठी पोटनिवडणुका पार पडल्या. त्यासाठी 30 नोव्हेंबरला मतदान तर 2 ऑक्टोबर रोजी मतमोजणी करण्यात आली. या निवडणुकीत भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने एकूण 15 जागांवर विजय मिळवला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने सर्वच्या सर्व म्हणजेच चार जागांवर विजय मिळवला.

By Election 2021 Result : 13 राज्यात विधानसभेच्या 29 जागांसाठी पोटनिवडणुका, कोणाचा विजय कोण पराभूत ? पूर्ण यादी
election
| Edited By: | Updated on: Nov 02, 2021 | 10:44 PM
Share

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशभरातील 13 राज्यात विधानसभेच्या 29 जागांसाठी पोटनिवडणुका पार पडल्या. त्यासाठी 30 नोव्हेंबरला मतदान तर 2 ऑक्टोबर रोजी मतमोजणी करण्यात आली. या निवडणुकीत भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने एकूण 15 जागांवर विजय मिळवला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने सर्वच्या सर्व म्हणजेच चार जागांवर विजय मिळवला. तर एकूण जागांपैकी काँग्रेसने आठ जागांवर आपला झेंडा रोवला.

कोणत्या राज्यात किती जागांसाठी निवडणूक

या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. कारण या निकालाच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी जनतेचा कौल जोखण्यास मदत होणार असल्याचे जाणाकार सांगतात. विधानसभेसोबतच लोकसभेच्या तीन जागांवर पोटनिवडणूक झाली. यामध्ये दादरा आणि नगर हवेलीची जागा शिवसेनेने जिंकली. तर हिमाचल प्रदेशातील मंडी या जागेवर काँग्रेसने विजय मिळवला. मध्य प्रदेशातील खांडवा येथील जागेवर भाजपने आपला झेंडा फडकवला. विधानसभा पोटनिवडणुकीत आसाममधील 5, पश्चिम बंगालमधील 4, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि मेघालयमधील प्रत्येकी 3 जागांसाठी मतदान पार पडलं होतं. तर बिहार, कर्नाटक आणि राजस्थान प्रत्येकी 2 जागांवर मतदान पार पडलं होतं. तर हरियाणा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मिझोराम आणि तेलंगणात प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक पार पडली आहे.

आसाममधील विधानसभेच्या 5 जागांचे निकाल

गोसाईगाव- भाजपचा मित्रपक्ष यूपीपीएल (UPPL) विजयी भबानीपूर- भाजपचा विजय तामुलपूर- भाजपचा मित्रपक्ष यूपीपीएलचा (UPPL) विजय मारियाणी – भाजपचा विजय थोरा- भाजपचा विजय

पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या 4 जागांचे निकाल

दिनहाटा- तृणमूल काँग्रेस 1,64,089 मतांच्या फरकाने विजयी. शांतीपूर- तृणमूल काँग्रेस 64,675 मतांनी विजयी. खर्डा- तृणमूल काँग्रेसचा उमेदवार 93,832 मतांनी विजयी. गोसाबा- तृणमूल काँग्रेसचा उमेदवार 1,43,051 मतांनी विजयी.

मध्य प्रदेशातील विधानसभेच्या तीन जागांचे निकाल

मध्य प्रदेशातील विधानसभेच्या तीन जागांचे निकाल पृथ्वीपूर- भाजपचा 15600 पेक्षा जास्त मतांच्या फरकाने विजय जोबात- भाजप 6 हजारांहून अधिक मतांनी विजयी. रायगाव- काँग्रेस 12 हजार मतांनी विजयी. हिमाचल प्रदेशमधील विधानसभेच्या तीन जागांचे निकाल फतेहपूर- काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय जुब्बल-कोटखई- काँग्रेसचा विजय अर्की – काँग्रेसचा विजय

मेघालयातील तीन विधानसभा जागांचे निकाल

माव्रेंगकेंग- एनपीपी (NPP) पक्षाचा 1816 मतांच्या फरकाने विजय. काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर. मावफ्लांग- UDP पक्षाचा उमेदवार 4401 मतांच्या फरकाने विजयी. काँग्रेस दुसऱ्या क्रंमावर, एनपीपी तिसऱ्या क्रमांकावर राजबाला- एनपीपी (NPP) 1926 मतांनी विजयी. काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, यूडीपी तिसऱ्या क्रमांकावर

बिहारमधील विधानसभेच्या 2 जागांचे निकाल

कुशेश्वरस्थान- JDU विजयी तारापूर- JDU विजयी

कर्नाटकातील विधानसभेच्या 2 जागांचे निकाल

सिंदगी विधानसभा- भाजप 31,185 मतांनी विजयी हंगल विधानसभा – काँग्रेसच्या उमेदवाराचा 7373 मतांनी विजयी

राजस्थानमधील विधानसभेच्या 2 जागांचे निकाल

वल्लभनगर- काँग्रेस 20400 मतांनी विजयी. धारियावाड- काँग्रेस 18,725 मतांनी विजयी.

या राज्यात एका जागेसाठी पोटनिवडणूक

आंध्र प्रदेशची बडवेल जागा- YSRC विजयी

हरियाणातील एलेनाबाद जागा – INLD पक्षाचे चौटाला यांचा विजय

मिझोरामची तुइरिअल जागा – भाजपचा मित्रपक्ष मिझो नॅशनल फ्रंटचा विजय

तेलंगणाची हुजुराबाद जागा- भाजपचा विजय

महाराष्ट्रातील देगलूर विधानसभा मतदारसंघ- काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी

इतर बातम्या :

Degloor Biloli Bypoll Election 2021 | काँग्रेसने करुन दाखवलं, विजयानंतर अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Bypoll Election Result | तीन जागांवर 3 पक्षांचे उमेदवार विजयी, लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये कोणाची सरशी ?

मुंबईत पुन्हा एनसीबीची कारवाई, विलेपार्ले परिसरातून कोट्यवधींचे हेरॉईन जप्त

(by poll election in 13 state for 29 seats kon all winners name and all information)

Follow Us
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न.

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या

मराठी अभिनेत्रीचा CJP आंदोलनाला विरोध, थेट विरोधी पोस्ट करत म्हणाली….

मराठी अभिनेत्रीचा CJP आंदोलनाला विरोध, थेट विरोधी पोस्ट करत म्हणाली…

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?