Bypoll Election Result | तीन जागांवर 3 पक्षांचे उमेदवार विजयी, लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये कोणाची सरशी ?

देशात तीन लोकसभा तसेच 29 विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली होती. या पोटनिवडणुकांचा निकाल आगामी राजकारणाची दिशा ठरवणारा असल्यामुळे त्याकडे सर्वांचेच लक्षं लागले होते. मध्यप्रदेशमधील खांडवा, दादरा नगर हवेली तसेच हिमाचल प्रदेशमधील मंडी अशा तीन लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुका तर चांगल्याच चुरशीच्या झाल्या होत्या.

Bypoll Election Result | तीन जागांवर 3 पक्षांचे उमेदवार विजयी, लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये कोणाची सरशी ?
pratibha singh and dnyaneshwar patil and kalaben delkar
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 6:20 PM

नवी दिल्ली : देशात तीन लोकसभा तसेच 29 विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली होती. या पोटनिवडणुकांचा निकाल आगामी राजकारणाची दिशा ठरवणारा असल्यामुळे त्याकडे सर्वांचेच लक्षं लागले होते. मध्यप्रदेशमधील खांडवा, दादरा नगर हवेली तसेच हिमाचल प्रदेशमधील मंडी अशा तीन लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुका तर चांगल्याच चुरशीच्या ठरल्या. यामध्ये तिन्ही जागांवर तीन वेगवेगळ्या पक्षांनी विजय मिळवला आहे.

ददरा नगरहवेलीमध्ये शिवसेनेचा बोलबालाt

मध्यप्रदेशमधील खांडवा या जागेवर भाजपने विजय मिळवला. तर दादरा नगर हवेली या जागेवर शिवसेनेने भगवा फडकवलाय.हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने आपली जादू दाखवून ही जागा खिशात घातली आहे. या तिन्ही जागा तीन वेगवेगळ्या पक्षांनी जिंकल्यामुळे देशपातळीवरील राजकाणाची निश्चित अशी दिशा ठरवणे अवघड झाले आहे. दादादा नगरहवेली या मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेकर या विजयी झाल्या आहेत. त्यांना 1 लाख 16 हजार 834 तर भाजपच्या महेश गावित यांना 66 हजार 157 मतं मिळाली आहेत. कलाबेन डेलकर यांनी भाजपच्या उमेदवाराचा 50 हजार 677 मतांनी पराभव केला आहे. एवढ्या मोठ्या फरकाने विजय मिळाल्यामुळे शिवसेनेच्या राज्याबाहेर विस्तारण्याच्या आकांक्षांना धुमारे फुटू लागले आहेत.

हिमाचलप्रदेशमध्ये भाजपला मोठा धक्का, काँग्रेसचा मोठा विजय

हिमाचलप्रदेशमध्ये तीन विधानसभा तसेच एका लोकसभेच्या जागेसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले. मंडी लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय. येथे काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा सिंग यांनी विजय मिळवलाय. तर भाजपचे उमेदवार कौशल ठाकुर यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. विजय मिळवल्यानंतर वाढती बेरोजगारी, महागाईला जनता त्रासली होती; याच कारणामुळे जनतेने भाजपला नाकारले, अशी प्रतिक्रिया प्रतिभा सिंग यांनी दिली.

मध्यप्रदेशमध्ये भाजपची सरशी, काँग्रेसचा पराभव

मध्ये प्रदेशच्या खांडवा मतदारसंघासाठीदेखील 30 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणू पार पडली. त्यानंतर आज मतमोजणी झाली. या जागेवर भाजप उमेदवाराने काँग्रेस तसेच अन्य पक्षांना मागे टाकत विजय मिळवला. भाजपकडून ज्ञानेश्वर पाटील यांनी ही निवडणूक लढवली. तर काँग्रेसचे उमेदवार राजनाराण मैदानात होते. पण पाटील यांच्या विजयामुळे भाजपकडून जल्लोष करण्यात योतोय. मतमोजणीच्या सुरुवातीला काँग्रेसचे उमेदवार राजनारयण सिंग चांगलेच आघाडीवर होते. नंतर मात्र, आघाडी मिळवत भाजपने ही लोकसभा निवडणूक जिंकली.

इतर बातम्या :

Dadra Nagar Haveli Election Result 2021 LIVE: शिवसेनेचं दिवाळीला सीमोल्लंघन, कलाबेन डेलकर यांचा 50 हजार मतांनी विजय

Maharashtra Election Results 2021 LIVE Counting: देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसची सरशी, जितेश अंतापूरकर विजयी

दुसऱ्याची मालमत्ता जप्त करुन अजितदादा पवारांचं नाव गोवण्याचं कारस्थान, नवाब मलिकांचा गंभीर आरोप

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.