Maharashtra Election Results 2021 Highlights : देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसची सरशी, जितेश अंतापूरकर विजयी

Deglur Biloli Bypoll Election Result : नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणी पार पडली. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. या पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकर विजयी झाले.

Maharashtra Election Results 2021 Highlights : देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसची सरशी, जितेश अंतापूरकर विजयी
काँग्रेसचे जितेश अंतापूरकर, वंचित आघाडीचे डॉ. उत्तम इंगोले, तर भाजपचे सुभाष साबणे

| Edited By: prajwal dhage

Nov 02, 2021 | 6:23 PM

Deglur Biloli Bypoll Election Result : नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणी पार पडली आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. या निवडणुकीत 64.95 % इतकं मतदान झालं होतं.या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे.

काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर देगलूरमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत एकूण 12 उमेदवार रिंगणात होते. असं असलं तरी 3 पक्षात प्रामुख्याने ही लढत झाली. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कारण संपूर्ण महिनाभर मंत्री अशोक चव्हाण देगलूर बिलोलीमध्ये तळ ठोकून होते. तर भाजपनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजपचे अनेक नेते आमदार पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण देगलूरमध्ये जीवाचं रान करुन प्रचार केला होता.

अनुसुचित जातीसाठी आरक्षित असणाऱ्या या मतदारसंघात काँग्रेसकडून जितेश अंतापूरकर (jitesh antapurkar), भाजपचे उमेदवार सुभाष साबणे (Subhash Sabane) तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. उत्तम रामराव इंगोले निवडणूक रिंगणात होते.

मवीआ – जितेश अंतापूरकर 108840 मते

भाजपा – सुभाष साबणे 66907 मते

काँग्रेस – 41933 मतांनी जितेश अंतापूरकर विजयी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 02 Nov 2021 04:57 PM (IST)

  देगलूर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची सरशी, जितेश अंतापूरकर विजयी

  देगलूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल

  देगलूरची जागा काँग्रसेचे जिंकली

  काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर विजयी

  41933 मतांनी जितेश अंतापूरकर विजयी

  मवीआ – जितेश अंतापूरकर 108840

  भाजपा – सुभाष साबणे 66907

  काँग्रेस – 41933 मतांनी जितेश अंतापूरकर विजयी

 • 02 Nov 2021 04:35 PM (IST)

  Deglur By Poll : नव्या जोमानं कामाला लागणार, सुभाष साबणेंची पहिली प्रतिक्रिया

  देगलूर विधानसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्ही मान्य करतो असे भाजपाचे उमेदवार सुभाष साबणे यांनी म्हंटल आहे, पराभवाने खचून न जाता भाजपातच राहून पुन्हा जोमाने कामाला लागू असं सुभाष साबणे म्हणाले.

 • 02 Nov 2021 04:22 PM (IST)

  Deglur by poll : 29 व्या फेरीअखेर जितेश अंतापूरकर 41हजार 557 मतांनी आघाडीवर

  देगलूर पोटनिवडणूक मतमोजणी

  ▪️एकोणत्तीसावी फेरी 29 (जिमाका)

  1 ) श्री. जितेश रावसाहेब अंतापूरकर (इंडियन नॅशनल कॉग्रेस) :- 107329

  2) श्री. सुभाष पिराजीराव साबणे (भारतीय जनता पार्टी) :- 65772

  3) श्री. उत्तम रामराव इंगोले (वंचित बहुजन आघाडी) :- 11097

  ▪️अंतापूरकर 41हजार 557 मतांनी आघाडीवर.

 • 02 Nov 2021 04:13 PM (IST)

  देगलूरचा विजय हा महाविकास आघाडीचा संयुक्त विजय: अशोक चव्हाण

  या निवडणुकीच्या निमित्तानं एक सरकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात काँग्रेसनं जागा राखल्या आहेत. हा विजय आहे हा महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचा संयुक्त विजय आहे. भाजपच्या प्रचाराला देगलूरच्या जनतेनं साथ दिली नाही. आमचा अजेंजा विकासाचा होता. पालकमंत्री या नात्यानं मी विकासासाठी प्रयत्नशील राहीन. हा विजय काँग्रेसचा असून महाविकास आघाडीचा देखील आहे. विकासाच्या विचाराला जनतेनं साथ दिली आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले. एकदंरीत ज्या पद्धतीनं कारवाई करुन वातावरण निर्माण केलं जातंय. ते पाहता हे दुर्दैवी असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले.

 • 02 Nov 2021 03:58 PM (IST)

  माझा विजय हा महाविकास आघाडीचा विजय, जितेश अंतापूरकर यांची पहिली प्रतिक्रिया

  जितेश अंतापूरकर यांनी माझा विजय हा महाविकास आघाडीचा विजय आहे. माझ्या वडिलांच्या निधनानंतर मला जनतेने भरभरून प्रेम दिलं त्यामुळे मी निवडून येऊ शकलो. मतदार संघाच्या विकासाचं माझ्या वडिलांनी स्वप्न पाहिलं होतं ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन, असं जितेश अंतापूरकर म्हणाले.

 • 02 Nov 2021 03:45 PM (IST)

  Deglur By Poll : काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 26 व्या फेरीअखेर 38126 मतांनी आघाडीवर

  देगलूर पोटनिवडणूक मतमोजणी

  ▪️सव्वीसावी फेरी 26 (जिमाका)

  1 ) श्री. जितेश रावसाहेब अंतापूरकर (इंडियन नॅशनल कॉग्रेस) :- 97157

  2) श्री. सुभाष पिराजीराव साबणे (भारतीय जनता पार्टी) :- 59031

  3) श्री. उत्तम रामराव इंगोले (वंचित बहुजन आघाडी) :- 10466

  ▪️अंतापूरकर 38126 मतांनी आघाडीवर.

 • 02 Nov 2021 03:39 PM (IST)

  Deglur by Poll Election : जितेश अंतापूरकर 37262 मतांनी आघाडीवर

  देगलूर पोटनिवडणूक मतमोजणी

  ▪️पंचेसावी फेरी

  1 ) श्री. जितेश रावसाहेब अंतापूरकर (इंडियन नॅशनल कॉग्रेस) :- 94221

  2) श्री. सुभाष पिराजीराव साबणे (भारतीय जनता पार्टी) :- 56959

  3) श्री. उत्तम रामराव इंगोले (वंचित बहुजन आघाडी) :- 10389

  ▪️अंतापूरकर 37262 मतांनी आघाडीवर.

 • 02 Nov 2021 03:38 PM (IST)

  Deglur by Election : 24 व्या फेरीअखेर जितेश अंतापूरकर 35795 मतांनी आघाडीवर

  देगलूर पोटनिवडणूक मतमोजणी

  ▪️चोवीसावी फेरी (जिमाका)

  1 ) श्री. जितेश रावसाहेब अंतापूरकर (इंडियन नॅशनल कॉग्रेस) :- 90421

  2) श्री. सुभाष पिराजीराव साबणे (भारतीय जनता पार्टी) :- 54626

  3) श्री. उत्तम रामराव इंगोले (वंचित बहुजन आघाडी) :- 10201

  ▪️अंतापूरकर 35795 मतांनी आघाडीवर.

 • 02 Nov 2021 03:20 PM (IST)

  Deglur by Poll: जितेश अंतापूरकर यांची 23 व्या फेरीअखेर आघाडी कायम

  देगलूर पोटनिवडणूक मतमोजणी

  ▪️तेविसावी फेरी (जिमाका)

  1 ) श्री. जितेश रावसाहेब अंतापूरकर (इंडियन नॅशनल कॉग्रेस) :- 86850

  2) श्री. सुभाष पिराजीराव साबणे (भारतीय जनता पार्टी) :- 52425

  3) श्री. उत्तम रामराव इंगोले (वंचित बहुजन आघाडी) :- 9841

 • 02 Nov 2021 02:29 PM (IST)

  Deglur ByPoll Result Live : काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 21 व्या फेरीअखेर 30 हजार 266 मतांनी आघाडीवर

  एकविसावी फेरी

  1 ) श्री. जितेश रावसाहेब अंतापूरकर (इंडियन नॅशनल कॉग्रेस) :- 78923

  2) श्री. सुभाष पिराजीराव साबणे (भारतीय जनता पार्टी) :- 48657

  3) श्री. उत्तम रामराव इंगोले (वंचित बहुजन आघाडी) :-8856

  ▪️अंतापूरकर 30266 मतांनी आघाडीवर.

 • 02 Nov 2021 01:59 PM (IST)

  Deglur ByPoll Result Live : काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 20 व्या फेरीअखेर 27 हजार 763 मतांनी आघाडीवर

  देगलूर पोटनिवडणूक मतमोजणी

  ▪️20 व्या फेरीअखेर काय परिस्थिती?

  1 ) श्री. जितेश रावसाहेब अंतापूरकर (इंडियन नॅशनल कॉग्रेस) :- 74821

  2) श्री. सुभाष पिराजीराव साबणे (भारतीय जनता पार्टी) :- 47058

  3) श्री. उत्तम रामराव इंगोले (वंचित बहुजन आघाडी) :- 8019

  ▪️अंतापूरकर 27763 मतांनी आघाडीवर.

 • 02 Nov 2021 01:57 PM (IST)

  Deglur ByPoll Result Live : काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 19 व्या फेरीअखेर 25 हजार 223 मतांनी आघाडीवर

  1 ) श्री. जितेश रावसाहेब अंतापूरकर (इंडियन नॅशनल कॉग्रेस) :-70675

  2) श्री. सुभाष पिराजीराव साबणे (भारतीय जनता पार्टी) :- 45452

  3) श्री. उत्तम रामराव इंगोले (वंचित बहुजन आघाडी) :- 7668

  ▪️अंतापूरकर 25 हजार 223 मतांनी आघाडीवर

 • 02 Nov 2021 01:08 PM (IST)

  Deglur ByPoll Result Live : काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 14 व्या फेरीअखेर 17 हजार 742 मतांनी आघाडीवर

  चौदावी फेरी

  1 )  जितेश रावसाहेब अंतापूरकर (इंडियन नॅशनल कॉग्रेस) :- 52599

  2) श्री. सुभाष पिराजीराव साबणे (भारतीय जनता पार्टी) :- 34857

  3) श्री. उत्तम रामराव इंगोले (वंचित बहुजन आघाडी) :- 5059

  ▪️अंतापूरकर 17742 मतांनी आघाडीवर

 • 02 Nov 2021 12:59 PM (IST)

  Deglur ByPoll Result Live : काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 13 व्या फेरीअखेर 16 हजार 238 मतांनी आघाडीवर

  देगलूर पोटनिवडणूक मतमोजणी

  •  तेरावी फेरी

  1 )श्री. जितेश रावसाहेब अंतापूरकर (इंडियन नॅशनल कॉग्रेस) :- 48530

  2) श्री. सुभाष पिराजीराव साबणे (भारतीय जनता पार्टी) :- 32292

  3) श्री. उत्तम रामराव इंगोले (वंचित बहुजन आघाडी) :- 5059

  ▪️अंतापूरकर 16238 मतांनी आघाडीवर

 • 02 Nov 2021 12:37 PM (IST)

  Deglur ByPoll Result Live : काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 12 व्या फेरीअखेर 14 हजार 175 मतांनी आघाडीवर

  देगलूर पोटनिवडणूक मतमोजणी

  ▪️बारावी फेरी काँग्रेस जितेश अंतापूरकर - 44344 भाजप सुभाष साबणे - 30169 वंचित डॉ. उत्तम इंगोले - 4464

  ▪️अंतापूरकर 14175 मतांनी आघाडीवर

 • 02 Nov 2021 12:23 PM (IST)

  Deglur ByPoll Result Live : काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 11 व्या फेरीअखेर 12580 मतांनी आघाडीवर

  देगलूर पोटनिवडणूक मतमोजणी

  ▪️अकरावी फेरी काँग्रेस जितेश अंतापूरकर - 40523 भाजप सुभाष साबणे - 27943 वंचित डॉ. उत्तम इंगोले - 4047

  ▪️अंतापूरकर 12580 मतांनी आघाडीवर

 • 02 Nov 2021 12:10 PM (IST)

  Deglur ByPoll Result Live : काँग्रेसचे जितेश अंतापूरकर दहाव्या फेरीअखेर 10969 मतांनी आघाडीवर

  देगलूर पोटनिवडणूक मतमोजणी

  ▪️ दहावी फेरी काँग्रेस जितेश अंतापूरकर - 36592 भाजप सुभाष साबणे - 25623 वंचित डॉ. उत्तम इंगोले - 3560

  ▪️जितेश अंतापूरकर 10969 मतांनी आघाडीवर

 • 02 Nov 2021 11:56 AM (IST)

  Deglur ByPoll Result Live : काँग्रेसचे जितेश अंतापूरकर नवव्या फेरीअखेर 10582 मतांनी आघाडीवर

  देगलूर पोटनिवडणूक मतमोजणी

  ▪️नववी फेरी- काँग्रेस जितेश अंतापूरकर - 33068 भाजप सुभाष साबणे - 22486 वंचित डॉ. उत्तम इंगोले - 3022

  काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 10582 मतांनी आघाडीवर

 • 02 Nov 2021 11:39 AM (IST)

  Deglur By Poll Result Live : काँग्रेसचे जितेश अंतापूरकर सातव्या फेरीअखेर 8212 मतांनी आघाडीवर

  देगलूर मतमोजणी सातव्या फेरी अखेर काँग्रेस (जितेश अंतापूरकर)- 25376 भाजप (सुभाष साबणे) - 17164 वंचित (डॉ. उत्तमराव इंगोले)- 2257

  जितेश अंतापूरकर 8212 मतांनी आघाडीवर

 • 02 Nov 2021 11:26 AM (IST)

  Deglur By Poll Result Live : काँग्रेसचे जितेश अंतापूरकर सहाव्या फेरीअखेर 7768 मतांनी आघाडीवर

  १.जितेश अंतपुरकर (काँग्रेस)- 4085

  २.सुभाष साबणे (भाजप)- 2487

  ३.डॉ. उत्तम इंगोले (वंचित)- 335

  काँग्रेस उमेदवार अंतापूरकर 7768 मतांनी आघाडीवर

  एकूण मते- काँग्रेस 22332 भाजप 14564 वंचित- 1840

 • 02 Nov 2021 10:56 AM (IST)

  Deglur By Poll Result Live : जितेश अंतापूरकर पाचव्या फेरीअखेर 6168 मतांनी आघाडीवर

  पाचव्या फेरी अखेर मिळालेली एकूण मते जितेश अंतापूरकर काँग्रेस - 18245 सुभाष साबणे भाजप- 12077 डॉ. उत्तमराव इंगोले वंचित-1505 अंतापूरकर 6168 ने आघाडीवर

 • 02 Nov 2021 10:45 AM (IST)

  Deglur By Poll Result Live : काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांची आघाडी चौथ्याफेरीअखेर कायम

  चौथ्या फेरीतील मते

  अंतापूरकर - 3788 साबणे - 2495 इंगोले - 352

  अंतापूरकर यांना 1293 चे मताधिक्य.

  अंतापूरकर 4557 मतांनी आघाडीवर आहेत.

  चौथ्या फेरीअखेरची मतमोजणी

  काँग्रेस -14500 भाजप- 10243 वंचित- 1225

 • 02 Nov 2021 10:25 AM (IST)

  Deglur Constituency Result Live : काँग्रेस उमेदवार जितेश अंतापूरकर तिसऱ्या फेरीअखेर 3264 मतांनी आघाडीवर

  तिसऱ्या फेरी अखेर काँग्रेसला मिळालेली एकूण मते 10712, तर भाजप 7448 मते

  तिसऱ्या फेरी अखेर काय स्थिती?

  १.जितेश अंतपुरकर (काँग्रेस)- 3418

  २.सुभाष साबणे (भाजप)-2447

  ३.डॉ उत्तम इंगोले (वंचित)- 104

  तिसऱ्या फेरीत काँग्रेसला  971 मतांची आघाडी

 • 02 Nov 2021 10:06 AM (IST)

  Deglur Constituency Result Live : जितेश अंतापूरकर 2293 मतांनी आघाडीवर

  जितेश अंतापूरकर 2293 मतांनी आघाडीवर.

  अंतापूरकर पहिल्या फेरीत 1624 मतांनी आघाडीवर होते.

  दोन्ही फेरीत मिळून 3926 मतांनी जितेश अंतापूरकर आघाडीवर आहेत.

 • 02 Nov 2021 09:41 AM (IST)

  Deglur Constituency Result Live : पहिल्या फेरीत काँग्रेसचे अंतापूरकर आघाडीवर, 1624 मतांचं लीड

  पहिली फेरी

  जितेश अंतापूरकर - 4216 सुभाष साबणे - 2592 डॉ. उत्तमराव इंगोले - 320

  अंतापूरकर 1624 मतांनी आघाडीवर आहेत.

 • 02 Nov 2021 08:51 AM (IST)

  देगलूरच्या चाव्या वंचितच्या हाती, इंगोले ठरवणार, पुढचा आमदार कोण?

  देगलूरची जागा कोण जिंकणार? हे वंचितचा उमेदवार ठरवणार आहे. देगलूरमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप अशी सरळसरळ लढत होत असली तरी वंचितच्या डॉ. इंगोले यांचा मोठा प्रभाव आहे. ते किती मतदान मिळवतात, यावर अंतापूरकर आणि साबणे यांचा विजय निश्चित होईल.

 • 02 Nov 2021 08:45 AM (IST)

  14 टेबलवर 30 फेऱ्यांमध्ये मतमोजणीला, देगलूरचा पुढचा आमदार कोण? दुपारी 12 वाजता स्पष्ट होणार!

  14 टेबलवर 30 फेऱ्यांची ही मतमोजणी होईल. या निवडणुकीत 64.95 % इतकं मतदान झालं. एकूण 2 लाख 98 हजार 535 मतदारांपैकी 1 लाख 90 हजार 800 इतक्या जणांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत. दुपारी 1 च्या आसपास देगलूरचा पुढचा आमदार कोण, हे चित्र स्पष्ट होईल.

 • 02 Nov 2021 08:43 AM (IST)

  कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतमोजणीला सुरुवात

  देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणूकीच्या मतमोजणीला आता सुरुवात होतेय. देगलूर इथल्या तहसील कार्यालयात ही मतमोजणी होतेय. त्याकरिता देगलूर शहरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलाय. देगलूर शहरातील साठे चौक ते नगरपरिषद कार्यालय हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय.

Published On - Nov 02,2021 8:34 AM

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें