Degloor Biloli Bypoll Election 2021 | काँग्रेसने करुन दाखवलं, विजयानंतर अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढवली.हा विजय लोकांचा विजय आहे," अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते तथा सर्वजनिक बांधकममंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. काँग्रेसने बिलोली देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मोठ्या फरकाने जिंकली त्यानिमित्त ते नांदेडमध्ये बोलत होते.

Degloor Biloli Bypoll Election 2021 | काँग्रेसने करुन दाखवलं, विजयानंतर अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
DMak
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 6:57 PM

नांदेड : “महाराष्ट्रात यावेळी काँग्रेसला पूर्वीपेक्षा जास्त मतदान मिळाले. राजस्थानमधील दोन्ही जागा काँग्रेसने जिंकल्या. हा विजय काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा विजय आहे. भाजपने खालची पातळी गाठून प्रचार केला होता. त्याला देगलूर बिलोलीच्या जनतेने साथ दिली नाही.आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढवली.हा विजय लोकांचा विजय आहे,” अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते तथा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. काँग्रेसने बिलोली देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मोठ्या फरकाने जिंकली. त्यानिमित्त ते नांदेडमध्ये बोलत होते.

अशोकराव चव्हाण काय म्हणाले ?

“भाजपने खालची पातळी गाठून प्रचार केला होता. त्याला देगलूर बिलोलीच्या जनतेने साथ दिली नाही. आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढवली. हा विजय लोकांचा विजय आहे. शंकरराव चव्हाण यांच्या पुन्याईला लोकांची नेहमीच साथ मिळालेली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला पूर्वीपेक्षा या वेळेला जास्त मतदान मिळालं. राजस्थानमधील दोन्ही जागा काँग्रेसने जिंकल्या. हा विजय काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा विजय आहे,” असे अशोक चव्हाण म्हणाले.

धाडसत्रामध्ये पॉलिटिकल अजेंडा

तसेच पुढे बोलताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेवर भाष्य केलं. “रात्री माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना इडेने अटक केली. हा कायदेशीर प्रक्रियेचा भाग आहे. मात्र गेल्या काही दिवसात देशात जे धाड सत्र सुरू आहे; त्यातून हा पॉलिटीकल अजेंडा असल्याचं समोर येत आहे,” असा आरोप अशोक चव्हाण यांनी केला.

राजकीय विरोधकाचे राजकारण संपवण्याचा प्रयत्न

तसेच त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि तिन्ही पक्ष एकत्र असल्याचे सांगितले. “पक्ष म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. राज्यात आमचं सरकार असताना आम्ही अशा पद्धतीने कुण्याही राजकीय विरोधकाचे राजकारण संपवण्याचा प्रयत्न केलेला नाही,” असा टोला नाव न घेता भाजपला लगावला.

उमेश अंतापूरकर मोठ्या फरकाने विजयी

दरम्यान, नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण यांचे राजकीय वर्चस्व असल्यामुळे देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली होती. काहीही झालं तरी ही निवडणूक जिंकायचीच असा चंगच त्यांनी बांधला होता. देगलूर बिलोलीची पोटनिवडणूक जिंकण्यासाठी चव्हाण यांनी जीवाचं रान केलं. त्यांनी या मतदारसंघात तळ ठोकला होता. शेवटी आज (2 ऑक्टोबर) निकाल लागला. या निवडणुकीत काँग्रेसने भाजपला मोठ्या फकराने हरवलं. काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांना एक लाखापेक्षा जास्त मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांना तब्बल 41 हजारपेक्षा जास्त मतांनी पराभव पत्करावा लागला.

इतर बातम्या :

Deglur Assembly by Election Result : भाजपला मोठा झटका, काँग्रेसच्या जितेश अंतापूरकरांचा मोठा विजय, सर्वत्र जल्लोष

Bypoll Election Result | तीन जागांवर 3 पक्षांचे उमेदवार विजयी, लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये कोणाची सरशी ?

….सारखं सारखं सगळीकडून चिमटं काढून कसं जमंल? अजित पवारांची शेरेबाजी ; पण कुणावर?

(congress won degloor biloli bypoll election 2021 ashok chavan first comment said it is success of maha vikas aghadi)

degloor biloli bypoll election result 2021

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.