ग्रामपंचायतीत धक्का, अशोक चव्हाण नांदेडमधील सर्वात महत्त्वाच्या नगरपंचायत निवडणुकीसाठी मैदानात

अशोक चव्हाण यांना शह देण्यासाठी भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकरही कामाला लागले आहेत (Ashok Chavan Bhokar Nagar Panchayat)

ग्रामपंचायतीत धक्का, अशोक चव्हाण नांदेडमधील सर्वात महत्त्वाच्या नगरपंचायत निवडणुकीसाठी मैदानात
काँग्रेस नेते अशोक चव्हाण
Follow us
| Updated on: Jan 22, 2021 | 8:48 AM

नांदेड : ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा खाली बसतो, तोच भोकर नगरपंचायतीची निवडणूक आता तोंडावर आली आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या मतदारसंघातील महत्त्वाची नगरपंचायत म्हणून भोकरची ओळख आहे. त्यामुळेच खुद्द अशोक चव्हाणही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. (Ashok Chavan campaigns Bhokar Nagar Panchayat Election Nanded)

भोकर नगरपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. नांदेडचे पालकमंत्री या नात्याने अशोक चव्हाणही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. भोकर शहरात आगामी काळात विविध विकास कामांचे उद्घाटन ते करणार आहेत.

चिखलीकरही निवडणुकीच्या मैदानात

भोकर नगरपंचायतीमध्ये गेल्या पाच वर्षांच्या काँग्रेसच्या काळात अनेक घोटाळे झाल्याचा आरोप विरोधक करत आहेत. या नगरपंचायतीच्या निवडणुकीत अशोक चव्हाण यांना शह देण्यासाठी भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकरही कामाला लागले आहेत, त्यामुळे इथली निवडणूक लक्षवेधी होणार आहे.

बारडमध्ये अशोक चव्हाणांना धक्का

भोकर मतदारसंघातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या बारडमध्ये शिवसेनेची सत्ता आल्यामुळे अशोक चव्हाण यांना नुकताच जोरदार धक्का बसला होता. 17 पैकी 16 जागांवर शिवसेनेने बाजी मारली. नांदेडमध्ये शिवसेनेने काँग्रेसला आणि पर्यायाने पालकमंत्री अशोक चव्हाण यांना शह दिल्याची चर्चा रंगली. या ग्रामपंचायतीत शिवसेना विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना होता.

सातत्याने काँग्रेसकडे असलेल्या या ग्रामपंचायतीची निवडणूक म्हणजे आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रंगीत तालीम मानली जाते. त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीतही अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. (Ashok Chavan campaigns Bhokar Nagar Panchayat Election Nanded)

लोकसभेला पराभवानंतरही अशोक चव्हाण 

लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी तत्कालीन खासदार अशोक चव्हाणांना पराभवाची धूळ चारली होती. लोकसभेला पराभूत झाल्यानंतर अशोक चव्हाण भोकर मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. विधानसभेतही पराभवाची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून चव्हाण जिद्दीला पेटले होते. विधानसभेला अशोक चव्हाणांनी विरोधकांना आस्मान दाखवले.

संबंधित बातम्या :

नांदेडमध्ये शिवसेनेकडून अशोक चव्हाणांना धक्का, 17 पैकी 16 जागांवर भगवा फडकवला

भोकरमध्ये खासदार चिखलीकरांची एकाकी झुंज, भाजप उमेदवाराच्या प्रचाराला नेत्यांची दांडी

(Ashok Chavan campaigns Bhokar Nagar Panchayat Election Nanded)

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.