Gram Panchayat Election Results 2021: नांदेडमध्ये शिवसेनेकडून अशोक चव्हाणांना धक्का, 17 पैकी 16 जागांवर भगवा फडकवला

नांदेडमध्ये शिवसेनेने काँग्रेसला आणि पर्यायाने पालकमंत्री अशोक चव्हाण यांना जोरदार धक्का दिला आहे.

Gram Panchayat Election Results 2021: नांदेडमध्ये शिवसेनेकडून अशोक चव्हाणांना धक्का, 17 पैकी 16 जागांवर भगवा फडकवला
Follow us
| Updated on: Jan 18, 2021 | 1:48 PM

नांदेड : पालकमंत्री अशोक चव्हाण यांना जोरदार धक्का बसला आहे. भोकर मतदारसंघातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या बारडमध्ये सेनेची सत्ता आली आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, 17 पैकी 16 जागांवर शिवसेनेनं बाजी मारली आहे. नांदेडमध्ये शिवसेनेने काँग्रेसला आणि पर्यायाने पालकमंत्री अशोक चव्हाण यांना जोरदार धक्का दिला आहे. भोकर मतदारसंघातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या बारडमध्ये शिवसेनेची सत्ता आली आहे. (Gram Panchayat Election Results 2021 Ashok Chavan big loss ShivSena won in nanded)

शिवसेनेचे 17 पैकी 16 सदस्य विजयी झाले. नांदेडमधील मोठी ग्रामपंचायत अशी बारडची ओळख होती. या ग्रामपंचायतीत शिवसेना विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना होता. अखेर शिवसेनेने इथे मुसंडी मारत 17 सदस्य संख्या असलेल्या बारड ग्रामपंचायतीच्या 16 जागा शिवसेनेने जिंकल्या. शिवसेनेने एकहाती विजय मिळवून अशोक चव्हाण यांना धक्का दिला.

नांदेड जिल्ह्यातील नायगांव विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार राजेश पवार यांना मोठा धक्का बसला आहे. राजेश पवार यांना त्यांच्या आलूवडगाव या गावात आपल्या गटाचा पराभव बघावा लागला आहे. आलूवडगावातील 9 पैकी केवळ 3 जागांवार भाजप आमदारांच्या गटाचा विजय झाला आहे.

आमदार राजेश पवारांच्या गटाचा पराभव

आलूवडगावमध्ये यापूर्वी स्थानिक आघाडीची सत्ता होती. भाजप आमदार राजेश पवार यांच्या गटानं 9 जागांपैकी 3 जागांवर विजय मिळवला. शिवाजी पवार यांच्या गटानं तब्बल 6 जागांवर विजय मिळवत आमदारांच्या गटाला सत्ते पासून दूर ठेवलं आहे. शिवाजी पवार यांच्या गटानं आलूवडगावात सत्ता मिळवली आहे. आलूवडगावातील भाजपचा पराभव राजेश पवारांना विचार करण्यास प्रवृत्त करायला लागणारा आहे.

नांदेड जिल्ह्यातील महत्वाच्या ग्रामंपचायत निकालांचे अपडेटस

– युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील यांच्या कोंढा गावात 9 पैकी आठ जागेवर काँग्रेसनं विजय मिळवला आहे.

– बिलोली तालुक्यातील जिगळा गावात भाजपच्या गटानं सत्ता मिळवली.

– माहुर तालुक्यातील आष्टा ग्रामपंचायत 9 पैकी 9 जागेवर काँग्रेस प्रणित पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत.

– हदगाव तालुक्यात शिवसेना बंडखोर बाबुराव कदम यांच्या गटाकडे बारा ग्रामपंचायती गेल्या आहेत. महाविकास आघाडी एकत्र येऊनही मतदारांनी बंडखोर बाबूराव कदम गटाला पसंती दिली.

– माहुर तालुक्यातील हरडप ग्राम पंचायतीमध्ये शिवसेना पुरस्कृत पॅनलचे 9 पैकी 9 उमेदवार विजयी झाले आहेत.

– लोहा तालुक्यातील नांदेड दक्षिण मतदार संघातील सायाळ गावात काँग्रेसनं सत्ता मिळवली आहे.

– धर्माबाद तालुक्यातील चोंडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या 7 उमेदवारांसह संपूर्ण पॅनल विजयी झालं आहे. (Gram Panchayat Election Results 2021 Ashok Chavan big loss ShivSena won in nanded)

संबंधित बातम्या:

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 LIVE | पाटणमध्ये शिवसेना नेते शंभूराज देसाई यांची बाजी, तर राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाची पिछाडी

Mhaisal Gram Panchayat Election Results 2021 : मेव्हणे मेव्हणे मेव्हण्यांचे पाहुणे, जयंत पाटलांचे सगळेच हरले!

माळशिरस ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : मोहिते पाटील गटाचं वर्चस्व कायम, भाजपची घौडदौड

(Gram Panchayat Election Results 2021 Ashok Chavan big loss ShivSena won in nanded)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.