शहीद पतीच्या स्मारकासोबत सेल्फी घेत लग्नाचा वाढदिवस साजरा

नवी दिल्ली : शहीद पतीसोबत सेल्फी घेतानाचा एक फोटो सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून अनेकांनी या फोटोला सॅल्यूट केला आहे. आपल्या शहीद पतीसोबत लग्नाचा वाढदिवस साजरा करताना शहीद कर्नल मुनेंद्र नाथ राय यांची पत्नी प्रियंका यांनी थेट स्मारकासोबत सेल्फी घेतला. कर्नल मुनेंद्र नाथ राय जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढत असताना शहीद […]

शहीद पतीच्या स्मारकासोबत सेल्फी घेत लग्नाचा वाढदिवस साजरा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

नवी दिल्ली : शहीद पतीसोबत सेल्फी घेतानाचा एक फोटो सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून अनेकांनी या फोटोला सॅल्यूट केला आहे. आपल्या शहीद पतीसोबत लग्नाचा वाढदिवस साजरा करताना शहीद कर्नल मुनेंद्र नाथ राय यांची पत्नी प्रियंका यांनी थेट स्मारकासोबत सेल्फी घेतला. कर्नल मुनेंद्र नाथ राय जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढत असताना शहीद झाले.

लग्नाचा 18 व्या वाढदिवशी शहीद कर्नल मुनेंद्र नाथ यांची पत्नी प्रियांका या खूप भावूक झाल्या होत्या. यावेळी त्यांनी स्मारकासोबत सेल्फी काढत आपल्या लग्नाचा 18 वा वाढदिवस साजरा केला. हा फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवर ‘जय हिंद’ आणि ‘सॅल्यूट’ अशा कमेंटचा पाऊस पडत आहे.

शहीद कर्नल मुनेंद्र नाथ यांना 26 जानेवारी रोजी वीरता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.  मात्र दुसऱ्याच दिवशी 27 जानेवारी 2015 रोजी पुलवामा येथे दहशतवाद्यांशी लढताना ते शहीद झाले. कर्नल मुनेंद्र नाथ हे 42 राष्ट्रीय रायफल- 9 गोरखा बटालियनचे कर्नल होते. काश्मीर खोऱ्यातील पुलवामा येथे हिज्बुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांशी लढताना त्यांना वीरमरण आलं. त्यांच्या मागे त्यांची पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये शहीद कर्नल यांच्या मुलीचा फोटोही व्हायरल झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर अलकानेही आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहताना सॅल्यूट केलं होते.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.