AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता ऑक्सिजनचा तुटवडा दूर होणार, केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

केंद्र सरकारने ऑक्सिजन आयातीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राने ऑक्सिजनच आयातीवरील बेसिक कस्टम ड्यूटी तसेच हेल्थ सेस पूर्णपणे माफ केला आहे. (coronavirus oxygen import custom duty)

आता ऑक्सिजनचा तुटवडा दूर होणार, केंद्र सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय
oxygen
| Updated on: Apr 24, 2021 | 4:53 PM
Share

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट (Coronavirus second wave) आल्यामुळे सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. रोज लाखोंच्या संख्येने नवे रुग्ण आढळत आहेत. सध्या रुग्ण वाढत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण पडतो आहे. ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्यायत. हीच गोष्ट लक्षात घेऊन केंद्र सरकारने ऑक्सिजन आयातीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राने ऑक्सिजनच्या आयातीवरील बेसिक कस्टम ड्यूटी (basic custom duty) तसेच हेल्थ सेस ( health cess) पूर्णपणे माफ केला आहे. ही करमाफी फक्त ऑक्सिजनच नाही तर ऑक्सिजनशी संबंधित असणाऱ्या अन्य उत्पादनांवरसुद्धा असेल. सरकारचा हा निर्णय तत्काळ प्रवाभावे लागू होईल. (Central Government decided to full exemption to basic custom duty and health cess on import of Oxygen to stop Coronavirus second wave)

उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

कोरोना महामारीशी संबंधित आढावा आणि उपायांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (24 एप्रिल) उच्चस्तरीय बैठक घेतली. यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, पंतप्रधानांचे मुख्य सचिव, तसेच अन्य महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये मोदी यांनी देशाला सध्या लिक्वीड ऑक्सिजनची मोठी गरज असल्याचे सांगितले. तसेच अशा परिस्थितीत सर्व मंत्रालयांनी एकजुटीने काम करणे गरजेचे असल्याचेसुद्धा मोदी म्हणाले.

नव्या निर्णयामुळे कोरोनाविरोधातील लढा सोपा

ऑक्सिजनच्या तसेच ऑक्सिजनशी संबंधित इतर उत्पादनांवरील आयातशुल्क माफ केल्यामुळे कोरोनाविरोधातील लढा सक्षमपणे राबवता येईल, असा दावा केंद्र सरकारने केला आहे. तसेच,या निर्णयामुळे ऑक्सिजनची आयातसुद्धा वाढेल. तसेच त्याची किंमतसुद्धा कमी होईल, असंसुद्धा सरकारने म्हटलंय. तसेच, ऑक्सिजन आणि इतर संबंधित वस्तूंच्या पुरवठ्यामध्ये सीमाशुल्क विभागाकडून कोणताही दिरंगाई होऊ नये, याची काळजी महसूल विभागाने घेण्याच्या सूचनासुद्धा मोदी यांनी आजच्या बैठकीत केल्या आहेत.

लसीवरील बेसिक कस्टम ड्यूटी माफ

दरम्यान, या बैठकीत केंद्र सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने कोरोना प्रतिबंधक लसींवरील बेसिक कस्टम ड्यूटीसुद्धा माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही निर्णयांमुळे देश कोरनाविरोधात आणखी तीव्रपणे लढा देईल, असा दावा केंद्र सरकारने केला आहे. तसेच, कोरोनाला थोपवण्यासठी आवश्यक ती सर्व संसाधनं, उपकरणं त्वरीत मिळू शकतील, असेसुद्धा केंद्राने म्हटले आहे. सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

इतर बातम्या :

Corona Cases and Lockdown News LIVE : 9 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन परदेशात पाठवला, छगन भुजबळ यांचा आरोप

फडणवीस चांगले मुख्यमंत्री होते, पण आता उतावीळपणे चुकीचं पावलं टाकली, माजी IPS ने कान टोचले

उत्तराखंडमध्ये हिमस्खलनाने पुन्हा हाहा:कार, सैन्याने 430 लोकांना बाहेर काढलं, आठ जणांचा मृत्यू, अजूनही शेकडो अडकल्याची भीती

(Central Government decided to full exemption to basic custom duty and health cess on import of Oxygen to stop Coronavirus second wave)

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.