CJP Tiranga Yatra : आंदोलनापूर्वीच दीपकेंच्या घरी पोलीस, अटक होणार? दिल्लीत मोठ्या घडामोडींना वेग

कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीत आज तिरंगा मार्च आयोजित केला आहे. या आंदोलनाला विरोध करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला असून, संयोजक अभिजीत दीपके यांच्या घरी पोलीस पोहोचले आहेत. कॉनॉट प्लेसमध्ये हाय अलर्ट आणि जमावबंदी लागू केली आहे.

CJP Tiranga Yatra : आंदोलनापूर्वीच दीपकेंच्या घरी पोलीस, अटक होणार? दिल्लीत मोठ्या घडामोडींना वेग
Abhijeet Dipke
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 16, 2026 | 2:31 PM

कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीत आज तिरंगा मार्चचं आयोजन केलं आहे. त्यामुळे दिल्लीत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हे आंदोलन होऊ नये म्हणून दिल्ली पोलीस आटोकाट प्रयत्न करत आहेत. आज संध्याकाळी 5 वाजता होणाऱ्या या आंदोलनापूर्वीच दिल्ली पोलीस अभिजीत दीपके यांच्या घरी पोहोचली आहे. त्यामुळे दीपके यांना पोलीस अटक करणार की काही अटी घालून आंदोलन करण्यास परवानगी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अभिजीत दीपके यांनी लहरा दो तिरंगा या आंदोलनाची घोषणा केली आहे. आशुतोष रांका आणि सौरव दास या दोन सहकाऱ्यांना तिरंगा फडकवल्याप्रकरणी अटक करण्यात आल्याने त्याचा निषेध म्हणून दीपके यांनी या आंदोलनाची हाक दिली आहे. दिल्लीच्या प्रसिद्ध कॅनॉट प्लेस येथे हे आंदोलन आज संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. त्यामुळे पोलिसांनी कॅनॉट प्लेस परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला आहे. तसेच हे आंदोलन होऊ नये म्हणून पोलीस खबरदारी घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पोलीस दीपके यांच्या घरी पोहोचली आहे. 15 ते 20 पोलीस दीपके यांच्या घरी अर्ध्या तासापासून असून त्यांच्याशी चर्चा करत आहेत. पोलीस मला अटक करू शकतात, असं दीपके यांनी कालच म्हटलं होतं. त्यामुळे आता पुढे काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Loading...

पोलीस अलर्ट

सेंट्रल पार्कमध्ये होणाऱ्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या संवेदनशील परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच हाय अलर्ट जारी करण्यात आला असून सुरक्षा एजन्सींना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच दिल्ली पोलिसांनी कॅनॉट प्लेस आणि आसपासच्या परिसरात निषेधाज्ञा लागू करण्यात आली आहे. तसेच लोकांना या मार्चपासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पोलिसांनी या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS)च्या कलम 163च्या अंतर्गत निर्बंध घातले आहेत. तर दिल्ली महापालिकेने प्रशासकीय कारणास्तव 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.

कोर्टाचा दिलासा

दरम्यान, काही व्यापाऱ्यांनी कॅनॉट प्लेसमधील सेंट्रल पार्कमध्ये होणाऱ्या आंदोलनाला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. पण हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने त्यात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. आम्ही या प्रकरणात हस्तक्षेप करू शकत नाही. कारण हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालय पाहात आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us