AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल तो बच्चा हैं जी… CM विजय सर्वांसमोर खेळत बसले टॉय कार, सोशल मीडियावर VIDEO व्हायरल

CM Vijay Viral Video : तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते सी जोसेफ विजय हे साधेपणामुळे पुन्हा चर्चेत आले आहे. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

दिल तो बच्चा हैं जी... CM विजय सर्वांसमोर खेळत बसले टॉय कार, सोशल मीडियावर VIDEO व्हायरल
CM Vijay Joseph toy CarImage Credit source: X
| Updated on: Jul 14, 2026 | 10:34 PM
Share

तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते सी जोसेफ विजय हे साधेपणामुळे पुन्हा चर्चेत आले आहे. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनला आहे. चेन्नईतील सचिवालयात व्हिएतनाममधील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी विनफास्टच्या प्रतिनिधींशी झालेल्या अधिकृत बैठकीदरम्यानचा त्यांचा हा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री विजय एका छोट्याशा टॉय कारसोबत खेळताना दिसत आहेत. यावर आता त्यांच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

विनफास्टकडून विजय यांना खास भेट

तामिळनाडूमध्ये EV क्षेत्रातील गुंतवणूक आणि संधींबाबत चर्चा करण्यासाठी चेन्नई सचिवालयात विनफास्टच्या प्रतिनिधीमंडळासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान विनफास्ट एशिया ऑपरेशन्सचे व्यवस्थापकीय संचालक फाम सान्ह चाऊ यांनी मुख्यमंत्री विजय यांना त्यांच्या कंपनीच्या इलेक्ट्रिक कारचे अत्यंत बारकाईने तयार केलेले मिनिएचर (स्केल मॉडेल) भेट दिले.

विजय टॉय कार खेळण्यात मग्न

विनफास्टकडून ही भेट हातात मिळताच मुख्यमंत्री विजय काही क्षणांसाठी अधिकृततेचे सारे बंधन विसरून एखाद्या लहान मुलाप्रमाणे आनंदी झाले. त्यांनी हसत-हसत त्या छोट्या कारचे चारही दरवाजे उघडले, आत डोकावून तिचे इंटीरियर बारकाईने पाहिले आणि त्या मॉडेलची जवळून पाहणी केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. माणूस कितीही मोठ्या पदावर पोहोचला तरी टॉय कार पाहिल्यावर त्याच्यातील लहान मूल जागे होते अशी कमेंट एक चाहत्याने केली आहे.

मुख्यमंत्री विजय यांना भेट म्हणून देण्यात आलेले हे स्केल मॉडेल विनफास्टच्या लोकप्रिय इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘VF 8’ चे होते. ही इलेक्ट्रिक SUV आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे.

विनफास्ट VF 8 ची वैशिष्ट्ये

या SUV च्या सेकंड जनरेशनच्या मॉडेलमध्ये 60.13 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. फ्रंट अॅक्सलवर बसवलेली इलेक्ट्रिक मोटर 228 हॉर्सपॉवर (hp) इतकी शक्ती आणि 330 Nm टॉर्क निर्माण करते. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार NEDC मानकांनुसार सुमारे 500 किमीपर्यंतची रेंज देते. कंपनीच्या दाव्यानुसार, ही कार 30 मिनिटांपेक्षा कमी वेळात 10% ते 70% पर्यंत चार्ज होऊ शकते. विशेष म्हणजे, या कारच्या जुन्या मॉडेलमध्ये 87.7 kWh क्षमतेची मोठी बॅटरी होती, जी 562 किमीपर्यंतची रेंज देत होती.

Follow Us
सोलापूरमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांना अडवले
माढ्यात शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांसमोर २ लाखांच्या कर्जमाफीची मागणी
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा...
Chinchpoklicha Chintamani | चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा व्हिडीओ
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीचं भव्य स्वागत
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीच्या भव्य स्वागताचा व्हिडीओ समोर
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या, गुणरत्न सदावर्तेंचा आरोप
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या आणि पूर्ण होऊ शकत नाहीत- गुणरत्न सदावर्ते
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य; तीन महिन्यांनी पुन्हा चर्चा
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स...
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स मीडिया ग्रुप आमनेसामने
राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
Rahul Gandhi | राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, केलं आवाहान...
Manoj Jarange Patil : अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, प्रत्येक मराठ्याला केलं आवाहन