AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीजेपीच्या आशुतोष-सौरव यांची न्यायालयीन कोठडी वाढवली, ममता बॅनर्जी भडकल्या, म्हणाल्या…

सीजेपीच्या आशुतोष-सौरव यांची न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली आहे. यावरून माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संताप व्यक्त केला आहे.

सीजेपीच्या आशुतोष-सौरव यांची न्यायालयीन कोठडी वाढवली, ममता बॅनर्जी भडकल्या, म्हणाल्या...
Mamata banerjeeImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 20, 2026 | 10:54 AM
Share

कॉक्रोच जनता पार्टीचे नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. दोघांची न्यायालयीन कोठडी दोन दिवसांनी वाढवण्यात आली आहे. परंतु दोघांची न्यायालयीन कोठडी दोन दिवसांनी वाढवल्याने माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संताप व्यक्त केला आहे. ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडियावर ‘एक्स’वर पोस्ट करत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने त्यांचे आभार मानले आहेत. तुमच्या पाठिंब्यासाठी आभारी आहोत, असे त्यांनी म्हटलं.

ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, एक धोकादायक व्हायरस आहे. या व्हायरसकडून दररोज लोकशाहीवर हल्ले करत आहेत. ‘जेन-झी’च्या तरुण-तरुणींचा छळ थांबवा. जे आता सत्तेत आहे, ते उद्या सत्तेत नसतील’. ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, ‘कोलकातापासून दिल्ली, मुंबई….सर्व देशात अत्याचाराचा कळस गाठला आहे. आमच्या पूर्वजांनी ब्रिटिश काळात शासकांचा त्रास सहन केला आहे. त्यानंतर त्यांच्याविरोधात लढाई जिंकलो. आता  सरकार पुरस्कृत दहशतवाद सुरू आहे.  पोलिसांकडून हा अत्याचार सुरू आहे’.

‘अत्याचार जास्त दिवस टिकणारा नाही. भारताची लोकशाही वाचवणारे मोठ्या ताकदीने उभे राहतील. तेव्हाच सत्तेत बसलेल्या गर्विष्ठ नेत्यांचे डोळे उघडतील. जेव्हा जनता जिंकेल, त्यादिवशी लोकशाहीची हत्या करणाऱ्यांचाही खात्मा होईल. आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आहोत. त्यामुळे आशुतोष आणि सौरव यांची तातडीने सुटका करा, असे त्यांनी म्हटलं आहे.  तर कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांनी सौरव दास, आशुतोष रांका यांची हेतपूर्वक न्यायालयीन कोठडी वाढवली, दोघांची सुटका करण्यात दिरंगाई केली जात आहे, असा आरोप दिपकेंनी केला.

दोघांची कोठडी दोन दिवसांनी वाढवली आहे. विशेष दंडधिकाऱ्यांनी हा निर्णय सुनावलाय. जंतर-मंतरवर विनापरवानगी प्रवेश करून झेंडा फडकवल्याने दोघांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आता या प्रकरणाची सुनावणी ही 21 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती मिळतेय. आता या दोघांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली. कोठडीत वाढ झाल्याने दोघांना जामिनासाठी आणखी दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे.

Follow Us
दसऱ्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं! 2 टन फुलांनी...
दसऱ्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं! 2 टन फुलांनी सजलेला गाभारा पाहून भाविक मंत्रमुग्ध
सिंधुताई सपकाळ यांच्या मुलाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा; प्रकरण समोर
सिंधुताई सपकाळ यांच्या मुलाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा; प्रकरण समोर येताच खळबळ
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब..
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब काय?
गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
Gokul Election Result : गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
Gokul Election Result : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
Tiger Shroff : टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील...
Tiger Shroff Case : महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील संशयितांचा प्रवास CCTV मध्ये कैद
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट...
Eknath Shinde Melava : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट; अवघ्या अडीच तासांत आटोपणार...
बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
Bacchu Kadu : बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
Gokul Election Result : गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत