AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात सोनम वांगचुकसह सेलिब्रिटीही उतरणार, थेट अमेरिकेतून फोन, विमानतळावरच… प्रसिद्ध वकिलाचा दावा काय?

प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी नुकताच एक मोठा दावा केला आहे. अमेरिकेतून 'कॉकरोच जनता पार्टी'चे अभिजित दिबके यांनी त्यांना फोन करून संवाद साधला असल्याचे म्हटले आहे.

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात सोनम वांगचुकसह सेलिब्रिटीही उतरणार, थेट अमेरिकेतून फोन, विमानतळावरच... प्रसिद्ध वकिलाचा दावा काय?
Cockroach Janata PartyImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 03, 2026 | 11:49 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून देशात ‘कॉकरोच जनता पार्टी’ने धुमाकूळव घातला आहे. भारतीय राजकारणात अनेकदा नवीन पक्ष स्थापन होत असतात. पण, गेल्या काही दिवसांत ज्या ‘पक्षाने’ सर्वाधिक लक्ष वेधून घेतले आहे, तो कोणताही पारंपारिक राजकीय पक्ष नसून इंटरनेट आणि मीम संस्कृतीतून निर्माण झालेली एक उपहासात्मक चळवळ आहे. ती म्हणजे ‘कॉकरोच जनता पार्टी’ अर्थात CJP. अवघ्या काही दिवसांतच या डिजिटल चळवळीने सोशल मीडियावर लाखो-करोडो लोकांचे लक्ष वेधून घेतले. आता कॉकरोच जनता पार्टी आंदोलन करणार असल्याचे समोर आले आहे.

प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी नुकताच एक मोठा दावा केला आहे. अमेरिकेतून अभिजित दिबके यांनी त्यांना फोन करून संवाद साधला असून, या चर्चेतून अनेक महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत. तरुणांचे आणि मुलांचे प्रश्न मांडण्यासाठी उभी राहिलेली ‘कॉकरोच जनता पार्टी’ आता मोठे आंदोलन उभारण्याच्या तयारीत असून, याला देशभरातील अनेक नामवंतांची साथ मिळण्याची शक्यता आहे.

विमानतळावरच अटकेची शक्यता?

अमेरिकेतून अभिजित दिबके यांनी फोन केल्यावर असीम सरोदे यांनी त्यांना महत्त्वाची सूचना केली. दिबके यांनी भारतात परतण्यापूर्वी येथील राजकीय परिस्थितीचा आणि संभाव्य धोक्यांचा अंदाज घेणे गरजेचे आहे. सरकार सूडबुद्धीने कारवाई करण्याच्या तयारीत असू शकते, त्यामुळे जर सर्व नियोजन पक्के असेल तरच त्यांनी भारतात यावे, असा सल्ला सरोदे यांनी दिला.

अभिजित दिबके यांचे भारतात येणे ही एक अत्यंत महत्त्वाची घडामोड ठरणार आहे. मात्र, सध्या त्यांच्या विरोधात ‘ते देशद्रोही कृत्य करत आहेत’ असा एक नॅरेटिव्ह (narrative) जाणीवपूर्वक तयार करण्यात आला आहे. यामुळे भारतात पाऊल ठेवताच विमानतळावरूनच त्यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे. असे असले तरी, सरकार लगेच अटकेची घाई न करता, दिबके यांना जनतेचा किती आणि कसा पाठिंबा मिळतो याची प्रथम चाचपणी करेल, अशी शक्यता सरोदे यांनी वर्तवली आहे.

‘गांधीजींच्या मार्गाचा अवलंब करा’

सध्याच्या व्यवस्थेत मुलांचे आणि तरुणांचे दुःख मांडण्यासाठी ‘कोकरोच पार्टी’ उभी राहिली आहे, अशी भावना अभिजित दिबके यांनी व्यक्त केली. यावर सरोदे यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले की, त्यांनी कोणतीही प्रक्षोभक भाषणे करू नयेत. आपल्या मागण्यांसाठी आणि आंदोलनासाठी त्यांनी महात्मा गांधीजींच्या शांततामय आणि अहिंसक मार्गाचाच अवलंब करावा.

आंदोलनात दिग्गजांची मांदियाळी

या आंदोलनाची व्याप्ती मोठी असणार आहे. असीम सरोदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या होणाऱ्या या घडामोडींमध्ये प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक आणि अभिनेते प्रकाश राज हे उपस्थित राहणार आहेत. यासोबतच सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी, पत्रकार निखिल वागळे आणि स्वतः असीम सरोदे यांनाही या निमित्ताने आमंत्रित करण्यात आले आहे. सध्या लोकांच्या मनात सरकारविरोधी मोठी खदखद आहे आणि तीच खदखद या आंदोलनाच्या आणि अभिजित दिबके यांच्या माध्यमातून बाहेर येत असल्याचे मत असीम सरोदे यांनी शेवटी नोंदवले आहे.

Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…