AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन आजच संपणार, पण.., धुव्र राठीची सर्वात मोठी घोषणा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. आपल्या या मागणीसाठी सीजेपीचं देशभरात आंदोलनं सुरू आहे. त्यानंतर आता धुव्र राठी यांच्याकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे.

कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन आजच संपणार, पण.., धुव्र राठीची सर्वात मोठी घोषणा
Dhruv Rathee Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 18, 2026 | 4:50 PM
Share

देशात सध्या कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने विविध ठिकाणी जोरदार आंदोलनं सुरू आहेत. कॉकरोच जनता पार्टीकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यानंतर त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी देशभरात आंदोलनाला सुरुवात केली आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीचं पहिलं आंदोलन हे मुंबईमध्ये झालं होतं. त्यानंतर दिल्लीमध्ये देखील मोठं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात चंगलाच गोंधळ झाला. दरम्यान त्यानंतर सरकारने दिल्लीच्या जंतर -मंतर मैदानावर आंदोलन करण्यासाठी आता कायम स्वरुपी बंदी घालती आहे. सरकारने या मैदानावर आंदोलन करण्यास बंदी घातलेली असताना देखील आणि या परिसरात जमावबंदी लागू असताना देखील कॉकरोच जनता पार्टीचे नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका त्या ठिकाणी गेले होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान याविरोधात पुन्हा एकदा कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक असलेल्या अभिजीत दिपके यांनी दिल्लीमध्ये आंदोलनाची हाक दिली होती. परंतु हे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली, सध्या त्यांची सशर्त जामीनावर सुटका करण्यात आली आहे. दरम्यान या आंदोलनात प्रसिद्ध युट्यूबर धुव्र राठी हे देखील सहभागी झाले होते. आता धुव्र राठींकडून लंडनमध्ये मोठी घोषणा करण्यात आली आहे. आजच भारतामध्ये सुरू असलेलं आंदोलन पूर्णपणे बंद होईल. परंतु त्यासाठी एकच अट आहे, ती म्हणजे तुम्ही आधी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्या, असं धुव्र राठी यांनी म्हटलं आहे.

धुव्र राठी काही दिवसांपूर्वी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जर्मनीवरून भारतात आले होते. मात्र आंदोलनात सहभागी होण्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्यामुळे ते या आंदोलनात सहभागी होऊ शकले नाहीत. दरम्यान ते आता लंडनमध्ये पोहोचले आहेत. लंडनमधून त्यांनी ही घोषणा केली आहे. हे आंदोलन आजच संपणार परंतु तुम्ही आधी ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्या, अशी अट त्यांनी ठेवली आहे. आम्हाला आमच्याच देशामध्ये आंदोलन करू दिलं जात नाहीये, आम्ही अराजकता निर्माण करतो असा आमच्यावर आरोप करण्यात येत आहे, परंतु आमची मागणी एवढीच आहे, की ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्या, आणि अशा निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करा जे निवडणूक आयुक्त सरकार आणि विरोधी पक्ष दोघांना सोबत घेऊन काम करतील. आम्हाला पारदर्शकता हवी आहे, असं धुव्र राठी यांनी म्हटलं आहे.

Follow Us
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट, महायुतीत धुसफूस कायम
राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं..
Aamir Khan Meet Raj Thackeray : राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं काय घडतंय? कारण अद्याप गुलदस्त्यात
पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
Mumbai : पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा निशाणा
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray; स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांचा थेट निशाणा
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण
कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
Gokul Milk Union Election 2026 : कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं...
Navnath Ban : उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं; नवनाथ बन यांचा ठाकरे-राऊतांवर निशाणा
प्रसिद्ध Maple लॉन अँड रेस्टॉरंटचा अन्न परवाना निलंबित; तपासणीत 96....
Chhatrapati Sambhajinagar : प्रसिद्ध Maple लॉन अँड रेस्टॉरंटचा अन्न परवाना निलंबित; तपासणीत 96 पैकी फक्त....