AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cockroach Janata Party : दोन आजी-माजी खासदार कॉकरोच जनता पार्टीत प्रवेश करणार? पक्षाला कॉकरोच नाव का दिलं? आरक्षण, नीट आणि… अजेंड्यात काय काय?

आजकाल सोशल मीडियावर 'कॉकरोच जनता पार्टी' बद्दल बरीच चर्चा सुरू आहे. मीम्स, राजकीय वादविवाद आणि तरुणांच्या संतापातून जन्मलेल्या या डिजिटल संघटनेने इंटरनेटवर झपाट्याने ओळख मिळवली आहे. या पक्षाशी संबंधित प्रत्येक प्रमुख प्रश्न आणि त्याची उत्तरं जाणून घेऊया...

Cockroach Janata Party : दोन आजी-माजी खासदार कॉकरोच जनता पार्टीत प्रवेश करणार? पक्षाला कॉकरोच नाव का दिलं? आरक्षण, नीट आणि... अजेंड्यात काय काय?
पक्षाला कॉकरोच नाव का दिलं?
| Updated on: May 21, 2026 | 3:25 PM
Share

सोशल मीडियावर आजकाल एक नाव प्रचंड ट्रेंड होतंय, ते म्हणजे ‘कॉकरोच जनता पार्टी’ (Cockroach Janata Party ). अनेक मीम्स, राजकीय चर्चा आणि तरुणांच्या संतापातून सुरू झालेली ही ऑनलाइन मोहीम आता इंटरनेटवर एक मोठा ट्रेंड बनली आहे. अवघ्या काही दिवसांत हजारो लोक यात सामील झाले आहेत. पण हा पक्ष नेमका आहे तरी काय, त्याची स्थापना कोणी केली आणि लोकांना त्यात इतका रस का आहे ? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

काय आहे कॉकरोच जनता पार्टी ?

कॉकरोच जनता पार्टी हा एक ऑनलाइन राजकीय व्यंग समूह असून, सर्वसामान्य लोकं, विशेषतः तरुणांचा, व्यवस्थेबद्दलचा राग आणि निराशा व्यक्त करण्यासाठी हा समूह तयार करण्यात आला आहे असं बोललं जातं. Voice of the lazy and unemployed – अशी याची टॅगलाईन आहे.

या पक्षेचा संस्थापक अभिजीत दीपकेयांनी या पक्षाबद्दल सांगितलं. ही फक्त फॅशन किंना ट्रेंड नव्हे तर आता हे एका संघटनेचे स्वरूप घेत आहे. ही केवळ एक तात्पुरती फॅशन असती, तर दोन लाखांहून अधिक लोकांनी आमच्या वेबसाइटवर नोंदणी केली नसती. इन्स्टाग्रामवरील पार्टीशी संबंधित कंटेंटला 4 दिवसांत सुमारे 50 लाख व्ह्यूज आणि प्रचंड प्रतिसाद मिळाला असा दावाही त्यांनी केला.

अचानक का झालं व्हायरल ?

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या एका वक्तव्यावरून सोशल मीडियावर वाद निर्माण झाला, तेव्हा या ट्रेंडची सुरुवात झाली. यानंतर, अनेक इंटरनेट युजर्नसी तरुण, बेरोजगारी आणि व्यवस्थेबद्दल आपला संताप व्यक्त केला. याचदरम्यान मीम्स, उपहास आणि राजकीय संताप यांचा मेळ साधत ‘कॉकरोच जनता पार्टी’ नावाची एक डिजिटल चळवळ उदयास आली आणि सोशल मीडियावर त्याला झपाट्याने लोकप्रियता मिळाली

कोणी केलं सुरू ?

30 वर्षांच्या अभिजीत नयांनी हा पक्ष सुरू केला आहे. त्यांनी 2020 ते 2023 दरम्यान आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीममध्ये व्हॉलिंटिअर म्हणून काम केलं होतं. ते सध्या अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक रिलेशन्समध्ये मास्टर्सचे शिक्षण घेत आहेत. 16 मे रोजी, त्यांनी लोकांना पक्षात सामील होण्यासाठी आमंत्रित करत, एक्स (X) वर एक गूगल फॉर्म शेअर केला. “व्यवस्थेने दुर्लक्षित केलेल्यांचा आवाज” असे पक्षाच्या वेबसाइटवर वर्णन आहे. “आम्ही भ्रष्टाचाराला ‘धोरणात्मक खर्च'(strategic spending) म्हणायला आलेलो नाही. ‘पैसा गेला कुठे?’एवढंच आम्हाला विचारायचं आहे, असं त्यात म्हटलंय.

अजेंड्यात काय काय?

पक्षाचा जाहीरनामा हा व्यंगात्मक आणि गंभीर राजकीय मागण्या यांचे मिश्रण आहे. त्यात खालील बाबींचा समावेश आहे :

– मंत्रिमंडळात महिलांसाठी ५० टक्के आरक्षण

– पक्ष बदलणाऱ्या खासदार आणि आमदारांवर २० वर्षांची निवडणूक बंदी

– निवृत्तीनंतर सरन्यायाधीशांना राज्यसभा पदे न देण्याची मागणी

– निवडणुकांमध्ये वैध मते वगळल्यास कारवाई

– याशिवाय, पक्षाने नीट (NEET) वादात सामील असलेल्या विद्यार्थ्यांनाही पाठिंबा दिला आहे.

‘झुरळ’ नाव का ठेवलं ?

हे नाव प्रतीकात्मक असल्याचं अभिजीत यांचं म्हणणं आहे. तरुणांचा आवाज उठवल्याबद्दल जर त्यांना ‘झुरळं’ म्हटलं गेलं असेल तर ते तीच ओळख स्वीकारतील, असं ते म्हणाले. झुरळं ही घाणीत आणि कुजलेल्या ठिकाणी जन्माला येतात व्यवस्थेतील सडकेपणा आणि जनतेचा संताप दर्शवण्यासाठी हे नाव निवडण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

कोण कोण आहे पक्षात ?

या पक्षाचा सदस्य होण्यासाठी तुम्ही बेरोजगार, आळशी, नेहमी ऑनलाइन असणारे आणि तुमच्या तक्रारी किंवा राग व्यावसायिक पद्धतीने व्यक्त करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. ही संपूर्ण चळवळ व्यंगात्मक आणि इंटरनेट संस्कृतीच्या माध्यमातून आपला मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

कोण आहे निगडीत ?

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा आणि कीर्ती आझाद हेहा सोशल मीडियावर गंमतीने या पक्षाबद्दल बोलले, तेव्हा या ट्रेंडला आणखी गती मिळाली. या पक्षात सामील होण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे? असं कीर्ती आझाद यांनी विचारलं होतं. 1983 चा वर्ल्डकप जिंकणे हीच पुरेशी पात्रता आहे, असं मजेशीर उत्तर पक्षाकडून यावेळी देण्यात आलं होतं.

याचं खरोखरच राजकीय पक्षात रूपांतर होणार का?

‘कॉकरोच जनता पार्टी’ केवळ एक इंटरनेट ट्रेंड म्हणून राहणारा आहे की ती कालांतराने एक मोठी राजकीय चळवळ बनेल, पक्षात रुपांतर होईल हे अजून स्पष्ट नाहीये. पण तरुणांचा राजकीय राग आणि असंतोष व्यक्त करण्यासाठी मीम्स, उपहास आणि सोशल मीडिया ही एक शक्तिशाली माध्यमे बनली आहेत हे यातून नक्कीच स्पष्टपणे दिसून येतं.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल