AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॉक्रोच जनता पार्टी राजकारणात एन्ट्री करणार? हा नेता अभिजीत दिपकेंचा आदर्श, काकांनी सगळं सांगितलं

कॉक्रोच जनता पार्टीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अवघ्या पाच दिवसांमध्ये या पार्टीने सोशल मीडियावरील फॉलोअर्सचे अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. या पार्टीला तरुणाइचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

कॉक्रोच जनता पार्टी राजकारणात एन्ट्री करणार? हा नेता अभिजीत दिपकेंचा आदर्श, काकांनी सगळं सांगितलं
Cockroach Janata PartyImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 21, 2026 | 4:45 PM
Share

भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील तरुणाईला झुरळाप्रमाणे असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आपण असं बोलल नसल्याचं देखील ते म्हणाले, परंतु त्यांच्या या विधानाचा निषेध करण्यासाठी अभिजित दिपके या मराठी तरुणाने कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केली. मात्र जेव्हा त्यांनी क्रॉकोच जनता पार्टीची स्थापना केली तेव्हा त्यांना देखील वाटलं नसेल की या पार्टीला तरुणाईचा एवढा प्रतिसाद मिळेलं. मात्र या पार्टीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे, अवघ्या पाच दिवसांमध्येच क्रॉकोच जनता पार्टीचे  इन्स्टाग्रामवर 10.5 मिलियन आणि ट्विटरवर जवळपास 1,60,000 फॉलोवर्स झाले आहेत. तरुणाइचा या पार्टीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान त्यानंतर आता अभिजित दिपके पुढे काय करणार? क्रॉकोच जनता पार्टीची नेमकी भूमिका काय असणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर आता अभिजित दिपके यांचे काका विलास दिपके यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. तामिळनाडूमध्ये विजय थलपती हे मुख्यमंत्री झाले तशा अभिजित दिपके यांच्या भावना असल्याची प्रतिक्रिया विलास दिपके यांनी दिली आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके हे मूळ हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी गावचे रहिवासी आहेत.

संतुक पिंपरी गावात अभिजीत दिपके यांचे काका आणि काकू वास्तव्यास आहेत. छोटे किराणा दुकान चालवून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अभिजीत दिपके यांच्या भावना आहेत की त्यांनी मुख्यमंत्री बनाव. ह्या पार्टीला त्यांनी भक्कम करावं आणि आमदार उभे करावेत. मला वाटतं सुरुवातीलाच त्यांचे महाराष्ट्रात दहा ते पंधरा आमदार निवडून येतील, अशी प्रतिक्रिया अभिजित दिपके यांचे काका विलास दिपके यांनी दिली आहे.

कॉक्रोच जनता पार्टीचं भारतातील ट्विटर अकाउंट संस्पेड 

दरम्यान दुसरीकडे मात्र क्रॉक्रोच जनता पार्टीला भारतात मोठा दणका बसला आहे. या पक्षाचं ट्विटर अकाउंट संस्पेड झालं आहे. याबाबत स्वत: अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे, अपेक्षेप्रमाणे भारतातील ट्विटर अकाउंट संस्पेड झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा