मेलेल्यांना जिवंत केल्याबद्दल धन्यवाद, राऊतांनी मानले सरन्यायाधीशांचे आभार; ट्विट चर्चेत

दिल्लीमधून मोठी बातमी समोर येत आहे, कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन चांगलंच पेटलं आहे. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी एक ट्विट केलं आहे, त्यांनी सरन्याधीशांचे आभार मानले आहेत.

मेलेल्यांना जिवंत केल्याबद्दल धन्यवाद, राऊतांनी मानले सरन्यायाधीशांचे आभार; ट्विट चर्चेत
sanjay raut
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 20, 2026 | 5:38 PM

दिल्लीमधून मोठी बातमी समोर येत आहे, कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन चांगलंच पेटलं आहे. कॉकरोच जनता पार्टीचा मोर्चा आता संसद भवनापासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर येऊन पोहोचला आहे. आंदोलकांनी बॅरिकेड देखील ओलांडले आहेत. पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्यासाठी आश्रुधुराचा मारा करण्यात आला आहे. याचदरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेलं एक ट्विट चांगलंच चर्चेत आलं आहे. त्यांनी या ट्विटमधून सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे आभार मानले आहेत. आजच्या या आंदोलनाचं श्रेय एकाच व्यक्तीला जातंं, माननीय सूर्यकांत जी, देशातील चळवळीला पुन्हा जिवंत केल्याबद्दल धन्यवाद असं ट्विट राऊत यांनी केलं आहे.

अभिजीत दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा 

दरम्यान अभिजीत दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा कॉक्रोच जनता पार्टीकडून करण्यात आला आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी हा दावा केला आहे. अभिजीत दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी यावेळी सर्व विरोधी पक्षांना देखील आवाहन केलं आहे. विरोधी पक्षांनी आता रस्त्यावर उतरावं, या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांची साथ द्यावी, असं आवाहान सौरव दास यांनी विरोधी पक्षांना केलं आहे.

 

पोलिसांकडून आश्रुधुराचा मारा 

दरम्यान आंदोलक अधिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहेत. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी बॅरिकेड लावले होते. परंतु आंदोलक हे बॅरिकेड ओलाडून संसदेच्या दिशेनं निघाले आहेत, त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी आश्रुधुराचा मारा केला. काही ठिकाणी लाठीचार्जच्या घटना देखील घडल्या आहेत.  यातच मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे हे आंदोलन सुरू असताना शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. तर दुसरीकडे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत विरोधकांनी सरकारला चांगलच घेरलं आहे.

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us