आता धावत्या ट्रेनमध्येही शॉपिंग करा

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक नवीन योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत रेल्वेमध्ये तुम्हाला जेवणांपासू इतर घरगुती सेवा पुरविल्या जात होत्या. मात्र आता चक्क रेल्वे तुम्हाला शॉपिंगचीही सुविधा देणार आहे. लवकरच धावत्या ट्रेनमध्ये तुम्हाला शॉपिंग सुविधा रेल्वेतर्फे दिली जाईल. ही सेवा पश्चिम रेल्वेच्या 16 मेल आणि एक्सप्रेस ट्रेनमध्ये चालू करण्यात येईल. मसर्स एचबीएन प्रायव्हेट …

, आता धावत्या ट्रेनमध्येही शॉपिंग करा

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक नवीन योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत रेल्वेमध्ये तुम्हाला जेवणांपासू इतर घरगुती सेवा पुरविल्या जात होत्या. मात्र आता चक्क रेल्वे तुम्हाला शॉपिंगचीही सुविधा देणार आहे. लवकरच धावत्या ट्रेनमध्ये तुम्हाला शॉपिंग सुविधा रेल्वेतर्फे दिली जाईल. ही सेवा पश्चिम रेल्वेच्या 16 मेल आणि एक्सप्रेस ट्रेनमध्ये चालू करण्यात येईल. मसर्स एचबीएन प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीला पाच वर्षाच्या कालावधीसाठी 3.66 कोटी रुपयांसाठी कंत्राट देण्यात आलं आहे.

या योजनेनुसार ट्रेनमध्ये 1 फूट- 3 फूट- 3 फूट अशा प्रकारचे डायमेंशनवाले शॉपिंग कार्ट असणार आहेत. तसेच यामध्ये दोन सेल्समन असतील. हे सेल्सेमन कंपनी आयडी आणि युनिफॉर्ममध्ये असतील. प्रवासी येथे कॅश व्यतिरिक्त डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारेही शॉपिंग करु शकतात. ही सुविधा जानेवारी 2019 च्या पहिल्या आठवड्यात सुरु केली जाईल. पहिल्या टप्प्यात तीन ट्रेनमध्ये ही सुविधा सुरु केली जाईल. ज्यामध्ये मुंबई-अहमदाबाद, शताब्दी एक्सप्रेस तर तिसऱ्या ट्रेनचे नाव अजून निश्चित झाले नाही.

ट्रेनमध्ये सौंदर्य, होम आणि किचन अप्लायंस आणि इतर फिटनेसचे सामान एफएमसीजी गुड्स या वस्तूंना ट्रेनमध्ये विकण्याची परवानगी दिली आहे. या वेंडर्सला कोणत्याही प्रकारचे खाद्य पदार्थ, तंबाखू, सिगरेट आणि गुटख्यासारखे पदार्थ विकण्याची परवानागी नाही, रेल्वे आणि राज्य सरकारकडून बंदी घालण्यात आलेली कोणतीही वस्तू ट्रेनमध्ये विकली जाणार नाही. असं पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी सांगितले.

रेल्वेच्या नियमानुसार, सेल्समन सकाळी 8 ते रात्री 9 पर्यंत ट्रेनमध्ये सामान विकू शकतो. 16 ट्रेनमध्ये ही सेवा सुरु करण्यासाठी आठ टप्प्यांमध्ये सुविधा दिली जाईल.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *