काँग्रेसची मोठी घोषणा! 1 नोव्हेंबरला दिल्लीत मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी पुन्हा लढाई
नवी दिल्लीतील ऐतिहास रामलीला मैदानात येत्या 1 नोव्हेंबर रोजी काँग्रेसचे आंदोलन होईल. 'वोट बचाओ, देश बचाव' असे या महारॅलीचे नाव ठेवण्यात आले आहे, अशी माहिती खरगे यांनी दिलीय.

Congress Delhi Protest : देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी या मागणीसाठी अनेक आंदोलनं केली आहेत. त्यांनी एसआयआर पद्धत तसेच निवडणुकीचे अनेक निर्णय हे सत्ताधारी भाजपाच्या सोईचे घेतले असा आरोप केला जातोय. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसनेही हा मुद्दा लावून धरलाय. दरम्यान, आता पुन्हा एकदा काँग्रेसने मोठी घोषणा केलीय. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठीचा लढा आणखी तीव्र करण्यात आला आहे.
काँग्रेसने नेमका काय निर्णय घेतला?
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये खरगे यांनी देशातील कोट्यवधील लोकांना एक आवाहन केलेय. ‘नवी दिल्लीतील ऐतिहास रामलीला मैदानात येत्या 1 नोव्हेंबर रोजी काँग्रेसचे आंदोलन होईल. ‘वोट बचाओ, देश बचाव’ असे या महारॅलीचे नाव ठेवण्यात आले आहे. संविधान वाचवण्यासाठी, देश वाचवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन खरगे यांनी केल,’ असे आवाहन खरगे यांनी यावेळी केले आहे.
आंदोलनाला सीजाेपी पाठिंबा देणार का?
म्हणजेच येत्या 1 नोव्हेंबर रोजी काँग्रेस दिल्लीमध्ये मोठे आंदोलन करणार आहे. या आंदोलनात ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाणार आहे. दुसरीकडे सीजेपीकडूनही पुन्हा एकदा ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. काहीही झालं तरी आम्ही राजीनामा घेणारच, असं सीजेपीने पुन्हा बोलून दाखवलंय. त्यामुळे आता सीजेपीचा या आंदोलनाला पाठिंबा असणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मल्लिकार्जुन खरगेंच्या विधानामुळे वाद
दरम्यान, मल्लिकार्जुन खरगे यांनी एकीकडे आंदोलनाची घोषणा केलेली असली तरीही दुसरीकडे खरगे एका विधानामुळे चर्चेत आलेले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ‘मोदी का बाप भी जाएगा’ असे विधान केलेय. त्यांच्या याच विधानावरून सत्ताधारी आक्रमक झाले आहेत. खरगे यांनी माफी मागितली पाहिजे. त्यांचे विधान हे निषेधार्ह आहे, असं म्हणत सत्ताधाऱ्यांनी खरगेंवर टीका केलीय.