Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांच्या जीवाला धोका? त्या गोपनीय अहवालाने यंत्रणांची झोप उडवली…
Threat to CEC Gyanesh Kumar: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. 10 ऑक्टोबरपासून दिल्लीत बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच एक मोठी अपडेट समोर येत आहे.

नवी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निवासस्थानी पोलिसांचा गरडा आहे. आग्रा येथील त्यांच्या घरासमोर यापूर्वीच काँग्रेस कार्यकर्त्यांनी उग्र निदर्शने केली होती. गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेसने आक्रमक आंदोलन सुरू केले आहे. तर त्यापूर्वी आप आणि डावे जंतरमंतरवर ठाण मांडून आहेत. दिल्लीत असंतोषाचा भडका उडाला आहे. 10 ऑक्टोबर रोजी दिल्ली आंदोलनाची रणभूमी होण्याची दाट शक्यता आहे. त्यातच आता ज्ञानेश कुमार यांच्या जिविताला मोठा धोका असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. दिल्लीत सुरक्षा यंत्रणांच्या हाती काही गोपनीय माहिती लागली आहे. त्यानुसार त्यांच्या जीवाला धोका वाढला आहे.
Z प्लस सुरक्षा
दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनुसार, ज्ञानेश कुमार यांना यापूर्वीच Z प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. पण नवीन गोपनीय अहवालानंतर आणि राजधानीतील उग्र प्रदर्शनानंतर त्यांच्या घराच्या बाहेर अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाजवळही मोठा पोलीस बंदोबस्त आहे. स्थानिक जिल्हा पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची मागणी केली होती. त्यानुसार नवीन निर्देश देण्यात आले आहेत. सर्व सुरक्षा यंत्रणा समन्वयाने काम करतील. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काम करण्यात येत आहे.
इंडिया आघाडीचे जोरदार शक्तीप्रदर्शन
इंडिया आघाडीने दिल्ली दणाणून सोडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत मोठा गदारोळ सुरू आहे. विरोधक रस्त्यावर उतरले आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधी-वाड्रा यांच्यासोबत घटक पक्षातील खासदारांनी पोलिसांच्या नाकेनऊ आणले आहेत. तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी Gen-Z च्या रस्त्यावर पोलिसांची वाहनं पंक्चर कर, तर कुठे वाहनांची चाबी घेऊन पळ काढ असे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे पोलिसांसमोर नवीन आव्हान उभं ठाकलं आहे.
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक ईरेला पेटले आहेत. तर दुसरीकडे केंद्र सरकार या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आता एक दिवसानंतर कॉकरोच जनता पार्टीचे जंतरमंतरवर आंदोलन होणार आहे. जर जंतरमंतरवर परवानगी नाकारली तर जिथे असू तिथेच जंतरमंतर सुरू करण्याचा इशारच सीजेपीने दिला आहे. या घडामोडींमुळे दिल्लीला छावणीचे स्वरूप आले आहे. सरकारपुढील पेच वाढला आहे. त्यातच सुप्रीम सुनावणीत निवडणूक आयोगाला कानपिचक्या दिल्या आहेत. आता येत्या दोन दिवसात असंतोषाचा वणवा पेटण्याची शक्यता आहे. यामुळे दिल्लीत मोठी सुरक्षा व्यवस्था वाढली आहे.