काँग्रेसला सर्वात मोठा धक्का; बड्या महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
कर्नाटकात काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला आहे. कर्नाटकातील बड्या महिला नेत्याने तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

कर्नाटकात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कर्नाटकातील सौम्या रेड्डी यांनी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांना पत्र पाठवत राजीनामा सोपवला आहे. रेड्डी यांनी 20 ऑगस्ट 2026 रोजी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी 2 वर्षासाठी स्वीकारली होती. परंतु त्यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे कर्नाटकातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
सौम्या रेड्डी यांनी अलका लांबा यांना पत्र लिहत म्हटलं की, कर्नाटकचं महिला प्रदेशाध्यक्ष पद जबाबदारी मिळाली होती. या पदाचा कार्यकाळ 2 वर्षांचा होता. त्यांनी पदाची जबाबदारी दिल्याबद्दल पक्षाचे आभार मानले. कर्नाटकातील विविध महिलांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या कार्यकाळातील अनुभव देखील त्यांनी सांगितले. सौम्या रेड्डी यांनी पुढे सांगितलं की, संपूर्ण कर्नाटकात दौरा करत महिलांच्या आरोग्य, शिक्षण, आर्थिक समस्यांवर संवाद साधल्याचे त्यांनी सांगितले. अनेक महिलांना काँग्रेसशी जोडल्याचेही त्यांनी सांगितले. महिलांशी संवाद साधणे आणि त्यांच्या समस्या समजून घेण्याचा अनुभव मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
महिला नेत्याच्या राजीनाम्याचा कारण काय?
काँग्रेसच्या हमी योजनांचा उल्लेख देखील त्यांनी केला. कर्नाटक सरकारच्या योजनांमुळे बदल घडल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेमुळे महिलांमध्ये क्रांती घडली. सरकारने दिलेल्या पाच हमींचा महिलांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले. परंतु त्यांनी कर्नाटक सरकारच्या त्रुटीवरही बोट ठेवलं. कर्नाटक सरकारच्या मंत्रिमंडळात एकही महिला नसल्याचे सांगितले. रेड्डी यांनी पत्रात अखिल भारतीय काँग्रेस समिती, कर्नाटक काँग्रेस प्रदेश समिती, विद्यमान आणि माजी मुख्यमंत्री, आमदार, मंत्री, पक्षातील कार्यकर्त्यांचे आभार मानले. या कार्यकाळात मदत करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचं रेड्डी यांनी आभार मानले.
मंत्र्यानंतर महिला नेत्याचा राजीनामा
सौम्या रेड्डी यांनी पदाचा राजीनामा देत पक्षाशी एकनिष्ठ राहणार असल्याचे स्पष्ट केले. काँग्रेसची विचारधारा, योजना पुढे नेण्यासाठी तत्पर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कर्नाटकाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावर नवीन नियुक्ती होत नाही, तोपर्यंत महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याआधी शिवकुमार सरकारमधील मंत्री नागेंद्र यांनी देखील राजीनामा दिला होता. त्यामुळेही राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली होती. त्यानंतर काँग्रेसच्या कर्नाटक महिला प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा दिल्याने जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
