असा एक देश जो तुम्ही थेट अख्खा भाड्याने घेऊ शकता; तुमचीची सत्ता, इथल्या तरुणीही…, एका दिवसाचं भाडं किती?
असा एक देश आहे, जो तुम्ही थेट भाड्याने घेऊ शकतात. तुम्ही पैसे भरल्यानंतर हा संपूर्ण देश तुमच्या मालकीचा होतो. इथे तुमच्या नावाचं चलन देखील तयार केलं जातं. तसेच तुम्हाला हवे ते करण्याची देखील मुभा असते.

जगाच्या पाठीवर असा देखील एक देश आहे, ज्याला तुम्ही भाड्याने देखील घेऊ शकता. तुम्ही एकदा हा देश भाड्याने घेतला तर तुम्हाला सोबतच या संपूर्ण देशाची चावी देखील मिळते. तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल मात्र ही खरी गोष्ट आहे. स्विर्झलँड आणि ऑस्ट्रिया या दोन देशांच्यामध्ये हा देश आहे. हा देश क्षेत्रफळाने खूप छोटा आहे, जर तुम्ही जगाच्या नकाशावर या जगाचा शोध घ्यायला गेलात तर तो तुम्हाला लवकर सापडणार देखील नाही, परंतु हा देश तुम्हाला एका रात्रीसाठी भाड्याने मिळू शकतो. तुम्ही सत्तर हजार डॉलर भारतीय चलनामध्ये साठ लाख रुपये देऊन हा संपूर्ण देश एका दिवसासाठी भाड्याने घेऊ शकतात.
तुम्ही जर हा देश बुक केला तर या देशांच्या सर्व रोडवर तुमच्या नावाच्या पाट्या लावल्या जातात. तसेच तुमच्या नावाची करन्सी देखील तयार केली जाते. तसेच या देशाचा जो राजा आहे, त्याच्याकडून तु्म्हाला तेथील राजवाड्याची चावी देखील दिली जाते. या देशामध्ये कोणताही क्राइम होत नाही. या देशात त्यांचे पोलीस देखील नाहीत, तसेच या देशाची स्वत:ची आर्मी देखील नाहीये. या देशात क्राइम होतच नसल्यामुळे येथील नागरिक आपल्या घराला कधी लॉक देखील लावत नाहीत. या देशात 1866 रोजी शेवटचे 80 सैनिक पाठवण्यात आले होते. त्यानंतर इथे कधीही आर्मी पाठवण्यात आली नाही.
तुम्हाला वाटेल हा एखादा गरीब देश आहे. परंतु जगातील जे काही मोजके श्रीमंत देश आहेत, त्या देशांच्या यादीमध्ये या देशाचा समावेश होतो. या देशाचं आणखी एक वैशिष्ट म्हणजे या देशात जेवढे लोक राहतात, त्यापेक्षा अधिक तर इथे कंपन्या आहेत. या देशाची लोकसंख्या केवळ चाळीस हजार आहे, तर या ठिकाणी कंपन्या तब्बल सत्तर हजार आहेत. या देशाचा जो राजा आहे, त्या राजाचं कुटुंब ब्रिटिश राज घराण्यापेक्षा देखील प्रचंड श्रीमंत आहे. यावरून तुम्हाला या देशाच्या श्रीमंतीची कल्पना येऊ शकते. या देशाचा राजा आजही किल्ल्यामध्येच राहतो.
या देशाच्या लोकांचं आयुष्य हे जगातील इतर देशांच्या तुलनेत सर्वात चांगलं मानलं जातं.या देशाचं नाव आहे,लिक्टनस्टाइन Liechtenstein दरम्यान तुम्ही जर हा देश भाड्याने घेतला तर तुम्ही येथील मुलींशी लग्न देखील करू शकतात, अर्थात त्यांची इच्छा असेल तरच अशाप्रकारे तुम्हाला लग्न करता येते. येथील मुली देखील प्रचंड सुंदर आहेत, तु्म्हाला हवा तेवढ्या दिवस हा देश भाड्याने घेऊ शकतात.
