AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्ली विधानसभा निवडणूक : अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात भाजपचा उमेदवार कोण?

भाजपने अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात (Arvind Kejriwal vs Sunil Yadav) भारतीय जनता युवा मोर्चा दिल्लीचे अध्यक्ष सुनील यादव यांना तिकीट दिलं आहे.

दिल्ली विधानसभा निवडणूक : अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात भाजपचा उमेदवार कोण?
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jan 21, 2020 | 10:59 AM
Share

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकीचं रण तापू लागलं आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal vs Sunil Yadav) यांच्या आम आदमी पक्षाने सर्व 70 उमेदवार एकाचवेळी जाहीर केले. त्यानंतर आता भाजपनेही दुसरी यादी जाहीर करुन 10 उमेदवारांची घोषणा केली. या उमेदवार यादीत भाजपने अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात (Arvind Kejriwal vs Sunil Yadav) भारतीय जनता युवा मोर्चा दिल्लीचे अध्यक्ष सुनील यादव यांना तिकीट दिलं आहे. भाजपने 57 उमेदवारांची पहिली यादी यापूर्वी जाहीर केली होती.

दरम्यान, नवी दिल्ली या मतदारसंघात आता अरविंद केजरीवाल विरुद्ध भाजपचे सुनील यादव अशी लढत होणार आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, केजरीवालांसमोर यादव यांचं आव्हान हे दुबळं आहे.  सुनील यादव यांच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, ते व्यवसायाने वकील आहेत. शिवाय त्यांना समाजकार्याची आवड आहे. त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात युवा मोर्चा मंडल अध्यक्ष म्हणून केली.

भाजपने या दहा जणांच्या यादीत दिल्ली भाजपचे फायरब्रँड नेते म्हणून ओळख असलेले तजिंदर पालसिंह बग्गा यांनाही उमेदवारी दिली. बग्गा यांना हरिनगर विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरवलं आहे. त्यांची लढत आपच्या राजकुमारी ढिल्लन यांच्याशी होणार आहे. याच मतदारसंघात काँग्रेसचे सुरेंद्र सेठी मैदानात आहेत.

भाजपने 17 जानेवारीला पहिली 57 जणांची उमेदवार यादी जाहीर केली होती. यामध्ये 20 नव्या चेहऱ्यांचा समावेश होता. यामध्ये चार महिला आणि 11 अनुसूचित जाती समुदायातील उमेदवारांचा समावेश होता.

दिल्ली विधानसभा निवडणूक

राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. (Delhi Assembly Election 2020 Dates) 8 फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे, तर 11 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. पुढील महिन्यात दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. दिल्लीत एकाच टप्प्यात सर्व 70 जागांसाठी मतदान होणार आहे.

दिल्ली विधानसभा निवडणूक

  • अधिसूचना – 14 जानेवारी
  • छाननी – 22 जानेवारी
  • अर्ज मागे घेण्याची तारीख – 24 जानेवारी
  • मतदानाची तारीख – 8 फेब्रुवारी 2020
  • मतमोजणीची तारीख – 11 फेब्रुवारी 2020

पक्षीय बलाबल 2015

  • आप – 67
  • भाजप – 03
  • काँग्रेस -00
  • एकूण – 70

संबंधित बातम्या  

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

Follow Us
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!.

Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी….

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी…

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या...

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या..