दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

8 फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे, तर 11 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. (Delhi Assembly Election 2020 Dates) 8 फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे, तर 11 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्या. पुढील महिन्यात दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. दिल्लीत एकाच टप्प्यात सर्व 70 जागांसाठी मतदान होणार आहे. दिल्लीत 15 फेब्रुवारीपासून केंद्रीय माध्यमिक शैक्षणिक बोर्डाच्या परीक्षा सुरु होणार आहेत. त्यामुळे त्यापूर्वीच दिल्ली विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम आटोपता घेतला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वातील आम आदमी पक्षाच्या सरकारने दिल्लीत पाच वर्ष पूर्णपणे सत्ता राखली. (Delhi Assembly Election 2020 Dates)

[svt-event title=”दिल्ली विधानसभा निवडणूक तारीख जाहीर” date=”06/01/2020,3:51PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

 

2015 मधील निकाल

दिल्ली विधानसभेसाठी 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत केजरीवालांच्या नेतृत्त्वातील आपने एकहाती बाजी मारली होती. आपने 70 पैकी तब्बल 67 जागी विजय मिळवला होता. भाजपला केवळ 3 जागाच जिंकता आल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नव्हती.

पक्षीय बलाबल 2015

  • आप – 67
  • भाजप – 03
  • काँग्रेस -00
  • एकूण – 70

लोकसभा निकाल 2019

भाजपला विधानसभेत यश मिळालं नसलं, तरी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने मुसंडी मारली. दिल्लीतील 7 पैकी सर्वच्या सर्व 7 जागा भाजपने जिंकल्या. मतांच्या टक्केवारीत भाजप पहिल्या, काँग्रेस दुसऱ्या तर आप तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI