AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Blast : दिल्ली स्फोटापूर्वी दहशतवादी उमर-मुझम्मिलमध्ये कडाक्याचं भांडण, कशावरून पेटला वाद ?

दिल्ली स्फोटाचा तपास एनआयए करत आहे. या प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटापूर्वी दहशतवादी डॉ. उमर आणि डॉ. मुझम्मिल यांच्यात मोठा वाद झाला होता. नेमकं काय घडलं होतं ?

Delhi Blast : दिल्ली स्फोटापूर्वी दहशतवादी उमर-मुझम्मिलमध्ये कडाक्याचं भांडण, कशावरून पेटला वाद ?
दिल्ली स्फोटाच्या तपासातून धक्कादायक माहिती उघड
| Updated on: Nov 22, 2025 | 9:11 AM
Share

राजधानी दिल्लीत 10 नोव्हेंबरला झालेल्या कार स्फोटाच्या (Delhi Blast) धक्क्यातून देश अद्याप सावरलेला नाही. दहशतलादी डॉ. उमर याने केलेल्या आत्मघातकी कार स्फोटात त्याच्यासह 12 जणांचा मृत्यू झाला तर 20 लोकं जखमी झाले आहेत. त्यांच्यापैकू काही जणांवर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तपास यंत्रणाकडून कसून तपास सुरू असून अनेकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडून अनेक महत्वाचे खुलासे झाले, बरीच धक्कादाायक माहितीदेखील उघड झाली. NIA सध्या स्फोटाच्या तपासात गुंतली आहे. दरम्यान, एक मोठा खुलासा समोर आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, स्फोटापूर्वी दहशतवादी डॉ. उमर आणि डॉ. मुझम्मिल यांच्यात मोठा वाद झाला. पैशांच्या मुद्यावरून हा वाद झाल्याचे समजते.

मिळालेल्या माहिताीनुसार, डॉक्टर मुझम्मिल याने मॉड्यूलसमोर 2 अटी ठेवल्या होत्या. पैसे परत करा किंवा सर्व सामान तिथेच ठेवू, अशा त्या अटी होत्या. अखेर मॉड्यूलने दुसरा पर्या निवडला आणि सर्व सामान मुझम्मिल याच्याकडेच ठेवलं, पण 9 नोव्हेंबरला अटक झाल्यावर मुझम्मिलच्या माहितीवरून ते सामान जप्त करण्यात आलं. वाद सोडवण्यासाठी उमरने सिग्नल ॲपवर एक गट तयार केला. त्याने आदिल, मुफर आणि इरफानसह डॉ. मुझम्मिलला त्यात ॲड केलं, पण वाद काही सुटला नाही.

दहशतवादी मुझम्मिलने दिली कबुली

दहशतवादी मुझम्मिलने तपास यंत्रणेसमोर कबूल केले की त्याने 2023 मध्ये दिल्ली आणि इतर अनेक शहरांमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा कट रचला होता. तो दोन वर्षांपासून या स्फोटासाठी स्फोटकांची व्यवस्था करत होता. अमोनियम नायट्रेट आणि युरिया मिळवण्याची जबाबदारी मुझम्मिल याच्यावर होती. याच मुझम्मिलने गुरुग्राममधून 26 क्विंटल एनपीके खत खरेदी केले होते.

नंतर या खताचे स्फोटकांमध्ये रूपांतर करण्याची जबाबदारी डॉ. उमर मोहम्मद याच्यावर होती. स्फोटासाठी रसायने, रिमोट आणि उपकरणाची व्यवस्था करण्याची जबाबदारीही त्याच्यावर होती. मुझम्मिलने एनपीके खत तीन लाख रुपयांना खरेदी केले होते.

ब्लास्टसाठी सेल्फ फंडिंग

एवढंच नव्हे तर या ब्लास्टसाठी सेल्फ फंडिंग करण्यात आलं होतं, असा खुलासाही तपासात झाला. डॉ. मुझम्मिल याने 5 लाख रुपये, डॉ. आदिल अहमद राथेरने 8 लाथ, डॉ. मुफ्फर अहमद राथेर याने 6 लाख रुपये दिले होते. तर डॉ. उमरने 2 लाख रुपये आणि डॉ. शाहीना शाहिद हिने 5 लाख रुपये दिले होते. एकूण 26 लाख रुपयांची कॅश अर्थात रोख रक्कम जमा करून ते पैसे डॉ. उमरला देण्यात आले होते.

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...