AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Lockdown | दिल्लीमध्ये आणखी एका आठवड्यासाठी लॉकाडाऊन वाढवला, वाढत्या कोरोनामुळे निर्णय

ल्लीमध्ये आणखी एका आठवड्यासाठी लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. (arvind kejriwal delhi lockdown extended)

Delhi Lockdown | दिल्लीमध्ये आणखी एका आठवड्यासाठी लॉकाडाऊन वाढवला, वाढत्या कोरोनामुळे निर्णय
lockdown
| Updated on: May 01, 2021 | 10:57 PM
Share

नवी दिल्ली : मागील अनेक दिवसापासून कोरोनाच्या दुसरी लाट हाहा:कार माजवते आहे. देशातील विविध राज्यांमध्ये कोरोनामुळे अनेकांचे मृत्यू होत आहेत. राजधानी दिल्लीमध्ये तर ही परिस्थिती जास्तच गंभीर आहे. दिल्लीमध्ये रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्यामुळे येथे ऑक्सिजन तसेच रेमडेसिव्हीर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन दिल्ली सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीमध्ये आणखी एका आठवड्यासाठी लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी ट्विट करुन तशी माहिती दिली आहे. (Delhi government extended Lockdown for one week announced by CM Arvind Kejriwal)

एप्रिल महिन्यापासून दिल्लीमध्ये लॉकडाऊन

दिल्लीमध्ये कोरोना रुग्ण वाढल्यामुळे खबरदारी म्हणून केजरीवाल यांनी लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णया अंतर्गत राजधानी दिल्लीमध्ये अनेक निर्बंध लागू केले गेले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत खबरदारी म्हणून केजरीवाल यांनी 19 एप्रिल रोजी एका आठवड्यासाठी लॉकडाऊन लागू केला होता. मात्र, रुग्णसंख्या आटोक्यात न आल्याने हा लॉकडाऊन पुन्हा एका आठवड्यासाठी वाढवण्यात आला. त्याची मुदत येत्या 3 मेपर्यंत असणार आहे. रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर काही प्रमाणात शिथिलता देण्यात येणार होती. मात्र, दिल्लीमध्ये सध्या अतिशय बिकट परिस्थिती असल्यामुळे पुन्हा एकदा येथील लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. आता सरकारने येथील लॉकडाऊन आणखी एका आठवड्यासाठी वाढवला आहे. तशी माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.

दिल्लीमध्ये ऑक्सिजनची कमतरता

दरम्यान, मागील काही दिवसांपसून दिल्लीमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे येथील आरोग्यव्यवस्था पुरती कोलमडली आहे. दिल्लीमध्ये एका दिवसाला तब्बल 976 टन ऑक्सिजनची गरज आहे. मात्र, दिल्लीसाठी ऑक्सिजनचा फक्त 490 टन एवढाच पुरवठा केला जातोय. शुक्रवारी फक्त 312 टन ऑक्सिजन मिळाला होता.

दरम्यान, दिल्लीमध्ये सोमवारपासून लसीकरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवला जाईल. त्यासाठी एकूण 4.5 लाख लसीचे डोस मिळाले आहेत. हे सर्व डोसेस वितरित करण्यात आलेले आहेत. लसीकरणावर बोलताना केजरीवाल यांनी लसीकरण केंद्रावर नाव नोंदणी केल्याशिवाय गर्दी करु नये असे जनतेला आवाहन केले आहे.

इतर बातम्या :

मोठी बातमी! WHO कडून मॉडर्ना लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता

धोका वाढला! राज्यात आज 63,282 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 802 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

रेमडेसिव्हीर लिहून देणाऱ्या रुग्णालयांवर प्रतिबंध आणा, अमोल कोल्हेंची अजितदादांकडे आग्रही मागणी

(Delhi government extended Lockdown for one week announced by CM Arvind Kejriwal)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.