AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Lal Kila Blast : श्रीनगरमधील एका पोस्टरने उघडला दिल्ली स्फोटातील कट, स्लीपर सेलपर्यंत असे पोहचले पोलीस

Red Fort Blast in Delhi : दिल्लीतील स्फोटामागे जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तान समर्थित संघटनेचा हात समोर येत आहे. तर श्रीनगरमधील एका पोस्टरने दिल्लीतील स्फोटाची आणि यामागील स्लीपर सेलचा भांडाफोड केला.

Delhi Lal Kila Blast : श्रीनगरमधील एका पोस्टरने उघडला दिल्ली स्फोटातील कट, स्लीपर सेलपर्यंत असे पोहचले पोलीस
लाल किल्ला स्फोट श्रीनगर पोस्टर कनेक्शन
| Updated on: Nov 11, 2025 | 11:25 AM
Share

Srinagar Poster Connection to Delhi Blast : दिल्लीतील स्फोटामागे पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. प्राथमिक तपासात तरी हीच बाब समोर येत आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी भारतात मोठे स्फोट करण्याच्या कटाचा पर्दाफाश केला. विविध शहरात काम करणारे काही डॉक्टर्स या दहशतवादी नेटवर्कशी जोडल्या गेल्याचे समोर आले आहे. दिल्लीजवळ हरियाणातील फरीदाबाद येथे मोठ्या प्रमाणात स्फोटक साडल्यानंतर हे प्रकरण समोर आले. पण श्रीनगरमधील एका पोस्टरने या सर्व कटाचा उलगडा झाला. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या सतर्कतेमुळे देशातील इतर अनर्थ टळला.

एका पोस्टरवरून कट समोर

जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी या कटाचा पर्दाफाश केला. यामध्ये विविध ठिकाणांवर काम करणाऱ्या काही डॉक्टर्सच्या दहशतवादी नेटवर्कशी संपर्क समोर आला आहे. दिल्लीजवळील फरीदाबाद येथून मोठ्या प्रमाणात स्फोटक जप्त करण्यात आले. पण हा कट श्रीनगर येथील नोगाम या परिसातील एका पोस्टरवरून उलगडला. या पोस्टरवर स्थानिक दुकानदारांना केंद्रीय तपास यंत्रणांशी कोणताही संपर्क न साधण्याची धमकीच देण्यात आली होती. या परिसरातील सीसीटीव्ही तापसण्यात आले. तेव्हा सहारनपूर येथील ही व्यक्ती असल्याचे समोर आले. पुढे तपासात ही व्यक्ती डॉ. अदील असल्याचे समोर आले. त्याला ताब्यात घेतल्याबरोबर त्याने या कटाची माहिती दिली. त्याने श्रीनगरमधील दोन तीन डॉक्टर आणि देशातील नेटवर्कची माहिती दिली. त्याआधारे पोलिसांनी फरीदाबादजवळील एका गावात स्फोटकांचा मोठा साठा जप्त करण्यात आला.

दहशतवादी नेटवर्कमध्ये अनेक डॉक्टर्स!

तपासानुसार, या दहशतवादी नेटवर्कची सुरुवात 2021-22 मध्ये झाली. यामध्ये सर्वात अगोदर हाशिम नावाच्या डॉक्टर सक्रिय होता. त्यानंतर काश्मीरमधील नेता डॉ. उमरकडे नेतृत्व गेले. त्यानंतर देशभरात आता या नेटवर्कमध्ये अनेक डॉक्टर्सचा सहभाग असल्याची माहिती सूत्रांनी प्राथमिक तपासाआधारे दिली आहे. डॉ. अदील याला जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने अनेक डॉक्टरची माहिती दिली. त्याआधारे दिल्ली स्फोटाशी संबंधित डॉ. मुज्जमिल यालाही अटक करण्यात आली. त्याच्या फरीदाबाद येथील क्लिनिकवर धाड टाकल्यावर तिथे मोठ्या प्रमाणात स्फोटकं सापडली आहेत.

30 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी या नेटवर्कमधील सदस्य डॉ. शकील याला अटक केली. त्याची दीर्घ चौकशी केल्यानंतर त्याने हरियाणातील फरिदाबाद येथील धौज गावात मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणि शस्त्र लपवल्याचे मान्य केले. या ऑपरेशनमधील अजून एक आरोपी डॉ. मुजम्मिल याला पोलिसांनी शिताफीने अटक केली. हा आरोपी फरीदाबाद येथील अल-फलाह या विद्यापीठात शिक्षक आहे. तो आणि अजून एक जण या स्फोटामागील ब्रेन मानण्यात येत आहे.

धौजमध्ये पोलिसांनी छापा टाकल्यावर त्या ठिकाणी 360 किलो अमोनियम नायट्रेट सापडले. हा सर्वाधिक ज्वलनशील घटक आहे. IED तयार करण्यासाठी त्याचा वापर करण्यात येतो. पोलिसांच्या मते हा घटक RDX नाही. पण अत्यंत घातक आहे. त्याआधारे मोठा स्फोट घडवण्यात येऊ शकतो. या तपासात जवळपास 5 किलो धातू आढळला. त्याचा वापर IED ची घातक क्षमता वाढवण्यासाठी करण्यात येतो. यासह 20 टायमर, बॅटरी, 24 रिमोट, इलेक्ट्रिक वायरिंग आणि अनेक इलेक्ट्रॉनिक सर्किटही पोलिसांनी जप्त केले. या आधारे देशातील तीन प्रमुख शहरांमध्ये मोठा स्फोट घडविण्याची तयारी करण्यात आल्याचे समोर येत आहे.

पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.