AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : त्याने प्रश्न विचारला, मंत्र्याने थेट कानाखाली मारली, नंतर असं घडलं की…व्हिडीओ व्हायरलं!

प्रवेश वर्मा यांच्यापुढे काही लोक जमले होते. हे लोक रस्त्याच्या गुणवत्तेबाबत तक्रार करत होते. या संभाषणात त्यांना सतत अनेक प्रश्न विचारले जात होते. त्यानंतर प्रवेश वर्मा यांना राग अनावर झाला आणि त्यांनी तरुणाच्या कानशिलात लगावली.

Video : त्याने प्रश्न विचारला, मंत्र्याने थेट कानाखाली मारली, नंतर असं घडलं की...व्हिडीओ व्हायरलं!
parvesh vermaImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 27, 2026 | 9:11 PM
Share

Delhi Minister Slap Young Man : राजधानी दिल्लीमध्ये नेहमीच राजकीय घडामोडी घडत असतात. दिल्लीच्या सरकारमध्ये मंत्री असलेले परवेश वर्मा यांनी एका तरुणाला जोरदार कानाखाली मारल्याची घटना घडली आहे. ही घटना टिळक नगरात घडली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामावरून संबंधित तरूण सवाल प्रश्न विचारत होता. जाब विचारत असतानाच मंत्र्याने तरुणाच्या कानाखाली मारले. तसा दावा आम आदमी पार्टीचे (आप पक्ष) दिल्ली अध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी हा व्हिडीओ त्यांच्या एक्स समाजमाध्यमावर शेअर केलाय. आता आप पक्षाकडून परवेश वर्मा यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली जातेय.

अतिशय लाजिरवाणे आणि भ्याड कृत्य केले

मिळालेल्या माहितीनुसार परवेश वर्मा आणि आप पक्षाचे आमदार जनरैल सिंह यांच्यात वाद झाला. हा वाद झाल्यानंतर परवेश वर्मा यांनी एका तरुणाच्या कानशिलात लगावली. ही घटना घडल्यानंतर आप पक्षाने थेट पोलीस ठाण्यात धाव घेऊन परवेश वर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. सौरभ भारद्वाज यांनी आपल्या सोशल मीडियाव पोस्टमध्ये परवेश वर्मा यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. ‘परवेश वर्मा यांनी अतिशय लाजिरवाणे आणि भ्याड कृत्य केले आहे. हा तरुण दिल्ली सरकारने बांधलेल्या रस्त्यांचा निकृष्ट दर्जा उघडकीस आणणारा व्हिडिओ रेकॉर्ड करत होता,” असा दावा भारद्वाज यांनी केला. तसेच पोलीस सुरक्षा रक्षकांना हटवून तर बघा, मग कळेल की तुम्ही खरंच किती ताकदवान आहात, असे खुले आव्हानही त्यांनी केले.

घटना नेमकी का घडली?

परवेश वर्मा यांच्यापुढे काही लोक जमले होते. हे लोक रस्त्याच्या गुणवत्तेबाबत तक्रार करत होते. या संभाषणात त्यांना सतत अनेक प्रश्न विचारले जात होते. त्यानंतर परवेश वर्मा यांना राग अनावर झाला आणि त्यांनी तरुणाच्या कानशिलात लगावली. ही घटना घडल्यानंतर काही काळासाठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. परंतु संरक्षणासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांनी येत जनतेला शांत केले. त्यानंतर परवेश वर्मा तेथून निघून गेले.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?