PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवीगाळ करणाऱ्या रुचिका सिंह बद्दल दिल्ली पोलिसांनी घेतला महत्वाचा निर्णय

PM Narendra Modi : मागच्या महिन्यात दिल्लीच्या जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टीने मोठं आंदोलन केलं. यावेळी काही तरुण मंडळींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अपशब्द वापरले होते. यात रुचिका सिंह ही अल्पवयीन मुलगी सुद्धा होती.

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवीगाळ करणाऱ्या रुचिका सिंह बद्दल दिल्ली पोलिसांनी घेतला महत्वाचा निर्णय
ruchika singh
| Updated on: Aug 03, 2026 | 11:34 AM

दिल्लीच्या जंतर-मंतरवर मागच्या महिन्यात कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन केलं. या प्रदर्शनावेळी रुचिका सिंह या अल्पवयीन मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली. तेव्हापासून रुचिका सिंह चर्चेत आहे. आता दिल्ली पोलिसांनी या मुलीला दिलासा दिला आहे. रुचिका सिंह विरोधात कुठलीही कारवाई करणार नाही असं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे. रुचिकाच्या आईने तिच्याविरोधात दाखल केलेला एफआयआर मागे घ्यावा अशी विनंती केली होती. दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, रुचिकाविरोधात कुठलाही FIR नोंदवण्यात आलेला नाही आणि यापुढेही नोंदवला जाणार नाही. या प्रकरणी नोएडा पोलिसांनी झिरो FIR नोंदवला होता. ही एफआयआर दिल्ली पोलिसांना पाठवण्यात आलेली. दिल्ली पोलिसांनी आता विषय न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रुचिका आणि तिच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रुचिका सिंहने माफी मागितली होती. तिचं म्हणणं होतं की, “ती अवघ्या 15 वर्षांची आहे. उपोषणस्थळी इतरांच्या प्रभावाखाली येऊन तिने अशी आक्षेपार्ह टिप्पणी केली. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मला माझ्या चुकीची जाणीव आहे. तिने ही तिची पहिली आणि शेवटची चूक असल्याचं सांगून आपल्या वागण्याबद्दल पश्चाताप व्यक्त केलेला. तिने सगळ्या देशाची माफी मागितलेली”

मुलं मार्ग भरकटली आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सर्व घटनांची दखल घेत एक व्हिडिओ पोस्ट केलेला. “मुलं मार्ग भरकटली आहेत. त्यांना शिक्षा देऊन किंवा न्यायालयात चकरा मारायला लावून परिस्थिती बदलणार नाही. मला अशा मुलांना माफ करायचं आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेले. त्यांनी समाजाला सुद्धा अशा मुलांना माफ करण्याचं आवाहन केलं होतं.

माझ्या मुलीला नवं आयुष्य दिलय

शनिवारी मुलीच्या आईने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे FIR मागे घेण्याची विनंती केली होती. पीएम मोदींनी मनाचा मोठेपणा दाखवत त्या मुलीला माफ केलं. पीएम मोदींनी माझ्या मुलीला नवं आयुष्य दिलय. सोबतच या मुलीच्या आईने 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुला-मुलींना सोशल मीडियाचा वापरण्याची परवानगी मिळू नये, अशी मागणी केली होती

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us