AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP रडारवर, फॉरेन फंडिंगविषयी सरकारचे मोठे पाऊल, मंत्र्यांनी थेट…

Pankaj Bhoyar on Abhijeet Dipke: एक मोठी अपडेट समोर येत आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सीजेपीने जंतरमंतरवर सरकारविरोधात एल्गार पुकारला होता. या आंदोलनामुळे मोदी सरकारमधील शिक्षण मंत्र्यांची विकेट पडली होती. आता सरकारने सीजेपीविषयी एक मोठे पाऊल टाकले आहे. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी मोठे संकेत दिले आहेत.

CJP रडारवर, फॉरेन फंडिंगविषयी सरकारचे मोठे पाऊल, मंत्र्यांनी थेट...
अभिजीत दिपके, फॉरेन फंडिग, पंकज भोयर
| Edited By: | Updated on: Aug 01, 2026 | 12:13 PM
Share

कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) 35 दिवस जंतर मंतरवर आंदोलन केले. नीट पेपरफुटी आणि तत्त्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीने एल्गार पुकारला होता. त्यांच्या दोन्ही मागण्या पूर्ण झाल्या. इतर काही मागण्यांविषयी सरकारने आश्वासन दिले आहे. आता सीजेपी सरकारच्या रडारवर आली आहे. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी याविषयीचे मोठे संकेत दिले आहेत. यापूर्वी सुद्धा भाजप आणि एनडीएच्या गोटातून सीजेपीवर हल्ले सुरूच होते. आता सरकारने सीजेपीला परदेशातून निधी मिळत आहे की नाही याची चौकशी करण्याचे निश्चित केले आहे.

CJP च्या आंदोलनाला तरुणाईचा भरभरून प्रतिसाद

अभिजीत दिपके यांनी 16 मे 2026 रोजी सरन्यायधीशांच्या तरुणांविषयीच्या झुरळ टिप्पणीनंतर कॉक्रोच जनता पार्टी ही डिजिटल पार्टी सुरू केली. या पार्टीच्या सोशल मीडिया पेजवर फॉलोअर्सचा महापूर आला. अभिजीत दिपके कोण याची विचारपूस सुरू झाली. दिपके समोर आले. त्यानंतर त्यांनी आपच्या सोशल मीडियाची जबाबदारी सांभाळल्याचे समोर आले. दिपके बोस्टन विद्यापीठातून भारतात परतल्यावर त्यांनी आंदोलनासाठी रीतसर परवानगी मिळवली आणि नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन सुरू केले. त्यांच्या आंदोलनात पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांनी उडी घेतली. ते उपोषणाला बसले. या सर्व आंदोलनावर भाजपच्या गोटातून गंभीर आरोप करण्यात आले. तरीही तरुणाईने हे आंदोलन उचलून धरले. हजारो तरुणांचे जत्थे दिल्लीतील जंतर मंतरकडे धावले.

CJP च्या फॉरेन फंडिंगची चौकशी

सीजेपी पक्षाला विदेशातून, परदेशातून निधी मिळत असल्याचा आरोप करण्यात आला. आता सीजेपीला फॉरेन फंडिंग करण्यात आली की नाही याची चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे. महाराष्ट्रात गृह विभागाने आणि केंद्रात ईडीकडून ही चौकशी सुरू असल्याची माहिती भोयर यांनी दिली आहे. सीजेपीसह इतर फॉरेन फंडिंग घेणाऱ्या संस्थांची चौकशी सुरू असल्याचे भोयर यांनी स्पष्ट केले.

या संस्था फॉरेन फंडिंगचा वापर सकारात्मक कामासाठी वापरत असतील तर हा निर्णय स्वागतार्ह आहे. पण देश, राज्य अथवा समाज अस्थिर करण्यासाठी हा पैसा वापरण्यात येत असेल, संस्था, संघटना जर त्यासाठी त्याचा वापर करत असतील. तर निश्चितपणे त्याची चौकशी करण्यात येईल, असे भोयर यांनी सांगितले. यामुळे सीजेपी ही आता केंद्रीय आणि राज्य तपास यंत्रणांच्या रडारवर आल्याचे मानले जात आहे.

संशय असेल तर चौकशी करा

यापूर्वी अभिजीत दिपके यांनी फॉरेन फंडिंगच्या आरोपावर टीकाकारांना थेट उत्तर दिले होते. सरकारला जर संशय असेल तर त्यांनी चौकशी करावी असे दिपके म्हणाले होते. आता या चौकशीतून काय बाहेर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर विरोधकांनी हा सीजेपीला बदनाम करण्याचा आणि आंदोलकांना जेरीस आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे.

Follow Us
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला