AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोटातील i-20 कारचा मालक कोण? नाव समोर येताच खळबळ!

दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात भीषण स्फोट झाला आहे. एका कारमध्ये हा स्फोट झाला असून एकूण 13 जणांचा मृत्यू झाला आहे. आता या कारच्या मालकीबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोटातील i-20 कारचा मालक कोण? नाव समोर येताच खळबळ!
delhi red fort blast
| Updated on: Nov 10, 2025 | 10:08 PM
Share

Delhi Blast : दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे एकूण 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्फोटाची ही माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा हेदेखील सक्रिय झाले आहेत. त्यांनी दिल्ली पोलिसांना तत्काळ फोन कॉल करून घडलेल्या घटनेची माहिती घेतली आहे. त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी व्यक्तींचीही भेट घेतली आहे. असे असतानाच आता या स्फोटाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. या कारमालकाचे नाव समोर आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

नेमकी काय अपडेट मिळाली?

मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीतील लाल किल्ला परिसरात सुभाष मार्गाजवळच्या सिग्नलजवळ हा स्फोट झाला आहे. अगोदर एका व्हॅनमध्ये हा स्फोट झाल्याचे सांगितले जात होते. आता मात्र खुद्द अमित शाहा यांनी हा स्फोट आय-20 या ह्युंदाई कंपनीच्या कारमध्ये स्फोट झाल्याचे सांगितले आहे. ही कार आता पोलिसांनी, फॉरेन्सिक टीमने ताब्यात घेतली असून तिची तपासणी केली जात आहे. कारमध्ये असलेले सर्व पुरावे गोळा केले जात आहे. या गाडीमध्ये नेमके काय होते? काही स्फोटकं होती का? याचा तपास केला जात आहे.

स्फोट झालेली कार नेमकी कोणाची?

हा स्फोट होताच पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली आहेत. घटनास्थळाच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही आता ताब्यात घेतले जात आहेत. सीसीटीव्हींची चाचणी करून हा स्फोट नेमका कसा झाला, याचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत केलेल्या तपासातून आय-20 कारच्या मालकाचे नाव समोर आले आहे. या कारची पासिंग हरियाणातील गुरुग्राम येथील असून कारचा मालक ही नदीम खान नावाची व्यक्ती आहे.

अमित शाहा यांनी नेमके काय सांगितले?

दरम्यान, अमित शाहा यांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटाच्या घटनेची सर्व अंगांनी तपासणी केली जात आहे. तपासणीतून जे काही समोर येईल ते जनतेपुढे मांडले जाईल, असे अमित शाहा यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमकी कोणती माहिती समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...