AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी वाढणार; ऐन दुष्काळात CM फडणवीस यांची मध्य प्रदेशातून सर्वात मोठी घोषणा

महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी वाढण्याच्या शक्यता आहे. कारण ऐन दुष्काळात CM फडणवीस यांनी मध्य प्रदेशातून सर्वात मोठी घोषणा केली आहे.

महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी वाढणार; ऐन दुष्काळात CM फडणवीस यांची मध्य प्रदेशातून सर्वात मोठी घोषणा
Cm devendra fadnavisImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 22, 2026 | 12:45 PM
Share

गोविंद ठाकूर, प्रतिनिधी : राज्यात दुष्काळामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सरकारच्या विविध विभागाकडून शेतकऱ्यांना मदत पुरवली जात आहे. काही आठवड्यांपूर्वी सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बांधणी केली. दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने आता अनेकांचे डोळे सरकरच्या मदतीकडे लागले आहेत. दुष्काळामुळे गावगाड्यातील तरुणांचे पावले रोजगारासाठी शहराकडे वळू शकतात. याचदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठी घोषणा केली आहे. पालघरमध्ये इंडस्ट्रीज झोन तयार करण्याची इच्छा व्यक्त फडणवीसांनी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘माझी या कार्यक्रमासाठी मुंबईची निवड केल्याबद्दल जे. पी. नड्डा यांचे आभार मानतो. या कार्यक्रमात 8000 बिझनेस व्हिजिटर्स सहभागी होणार आहेत, अनेक देशांमधून लोक येथे येत आहेत, केमिकल इंडस्ट्रीला पुढे नेण्याचा हा प्रयत्न आहे.  आम्ही सर्व जाणतो, केमिकल्सचा प्रवास फार जुना आहे. सिंधू संस्कृतीतही केमिकल्सचा उपयोग व्हायचा. त्या काळी देखील आपल्याला केमिकल्सचा उपयोग माहीत होता. आमच्या देशात रसायनचा अभ्यास करण्यातही पुढे होतो. यासाठी भारत आणि केमिकल्सचा जुना इतिहास आहे. रसविद्या, रसायनशास्त्राचे ग्रंथ देखील आहे’.

पालघरमध्ये केमिकल इंडस्ट्रीज झोन तयार करणार –  देवेंद्र फडणवीस 

‘दोन हजार वर्षांपूर्वीपासूनच वेगवेगळी रसायने एकत्र करून वैद्यकीय क्षेत्रात आपण खूप पुढे होतो, भारताला या क्षेत्रात इतिहास आहे. आज कोणत्याही देशासाठी रसायन क्षेत्र खूप महत्त्वाचे आहे. सर्वच क्षेत्रात केमिकलचे मोठे योगदान आहे. आपल्या भावना केमिकलने चालतात, मुंबईत (Mumbai) कोणी गडबड केली तर आपण म्हणतो केमिकल लोचा आहे. महाराष्ट्रात 3600 इंडस्ट्रीज केमिकल क्षेत्रात काम करतात. महाराष्ट्रात जेनेरिक मेडिसिनमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रात अनेक इंडस्ट्रियल इस्टेट तयार केल्या आहेत, एनर्जी टेक्नॉलॉजीमध्ये बॅटरी फॅसिलिटी खूप पुढे जात आहे.  देशातील सर्वात मोठे बंदर महाराष्ट्रात तयार होत आहे, पालघरमध्ये (Palghar) एक मोठा केमिकल इंडस्ट्रीज झोन तयार करू इच्छितो, असे फडणवीस पुढे म्हणाले.

Follow Us
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने राजकीय वर्तुळात खळबळ
जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण..
Jarange Patil Viral Audio Clip : जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा....
Manoj Jarange On Eknath Shinde : 500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा, पुढे काय म्हणाले?
मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; श्रीकांत शिंदेंचंही नाव, जरांगे काय खुलासा करणार?
पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या....
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दौऱ्याचा उल्लेख करत काय म्हणाले?
मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
Mumbai Airport : मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; AQI थेट...
Mumbai Air Pollution : मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; नागरिकांच्या आरोग्याला धोका, AQI थेट...
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी