दिग्विजय सिंहांनी विचारलं, 15 लाख मिळाले का? तरुण मंचावर येऊन म्हणाला....

भोपाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 लाख रुपये तुम्हाला दिले का, असं अनेक विरोधक सभेत विचारतता. पण भोपाळचे काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांनी हा प्रश्न सभेतील लोकांना विचारला आणि एक तरुण थेट व्यासपीठावर आला. व्यासपीठावर येऊन त्याने माईक घेतला आणि म्हणाला, ‘मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केला आणि दहशतवाद्यांना मारलं’. या तरुणाच्या धाडसाने काँग्रेस नेत्यांची चांगलीच गोची …

दिग्विजय सिंहांनी विचारलं, 15 लाख मिळाले का? तरुण मंचावर येऊन म्हणाला....

भोपाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 लाख रुपये तुम्हाला दिले का, असं अनेक विरोधक सभेत विचारतता. पण भोपाळचे काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांनी हा प्रश्न सभेतील लोकांना विचारला आणि एक तरुण थेट व्यासपीठावर आला. व्यासपीठावर येऊन त्याने माईक घेतला आणि म्हणाला, ‘मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केला आणि दहशतवाद्यांना मारलं’.

या तरुणाच्या धाडसाने काँग्रेस नेत्यांची चांगलीच गोची झाली. कुणाच्या खात्यात 15 लाख रुपये आले का, असं दिग्विजय सिंहांनी विचारलं. सभेत बसलेल्या एका मुलाने हात वर केला आणि त्याला स्टेजवर बोलावण्यात आलं. त्याने माईकचा ताबा घेतला आणि दिग्विजय सिंहांच्या प्रश्नाला उत्तर दिलं. यानंतर दिग्विजय सिंहांचीही तारांबळ उडाली. हे सोडा, पण तुम्हाला जॉब मिळाला का, पैसे आले का, असा प्रश्न त्यांनी विचारला.

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *