AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supreme Court Hearing : सुप्रीम कोर्टात 14 फेब्रुवारीपासून आठवड्यातून दोन दिवस प्रत्यक्ष सुनावणी; कोरोनाची रुग्णसंख्या घटल्याने निर्णय

प्रत्यक्ष सुनावणी आठवड्यातून दोनदा म्हणजेच बुधवार आणि गुरुवारी या दोन दिवशी घेतली जाणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा उद्रेक कमी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या सुधारित मानक कार्यप्रणालीचे (SOP) पालन करीत न्यायालयीन कामकाज सुरु राहणार आहे.

Supreme Court Hearing : सुप्रीम कोर्टात 14 फेब्रुवारीपासून आठवड्यातून दोन दिवस प्रत्यक्ष सुनावणी; कोरोनाची रुग्णसंख्या घटल्याने निर्णय
प्रेमविवाह केला म्हणून मुलीचा वडिलांच्या संपत्तीवरचा हक्क संपत नाहीImage Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Feb 09, 2022 | 2:21 PM
Share

नवी दिल्ली : देशात कोरोना (Corona) संसर्गाचा उद्रेक आटोक्यात आला आहे. त्यामुळे विविध राज्ये कोरोना निर्बंध काही प्रमाणात शिथिल करू लागली आहेत. याचदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सुद्धा प्रत्यक्ष सुनावणी पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या 14 फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष सुनावणी सुरु होणार आहे. सुरुवातीला आठवड्यातून दोन दिवस सुनावणी चालणार असून कोरोनाच्या संसर्गात आणखी घसरण झाल्यानंतर परिस्थितीचा विचार करून प्रत्यक्ष सुनावणीचे दिवस वाढवले जाण्याची शक्यता आहे. यामुळे प्रलंबीत खटल्यांचा निपटारा करण्यास गती मिळणार आहे. कोरोनाची चिंता कमी झाल्याने हा निर्णय घेतला गेला आहे. (Direct hearing in the Supreme Court two days a week from February 14)

राजधानी दिल्लीतील कोरोना संसर्ग उतरणीला

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीत कोविड-19 च्या संसर्गात मोठी वाढ झाली होती. सर्वोच्च न्यायालयातही न्यायाधीशांपासून अनेकांना कोरोनाची लागण झाली होती. ही संसर्गाची परिस्थिती सुधारल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 14 फेब्रुवारीपासून पुन्हा प्रत्यक्ष सुनावणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सरचिटणीसांनी याबाबत निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की भारताच्या सरन्यायाधीशांनी न्यायाधीशांच्या समितीशी सल्लामसलत करून प्रत्यक्ष सुनावणी पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड-19 च्या रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्या अनुषंगाने दिल्ली सरकारने जारी केलेल्या विविध सूचनांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी प्रत्यक्ष सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आठवड्यातून बुधवारी आणि गुरुवारी होणार प्रत्यक्ष सुनावणी

प्रत्यक्ष सुनावणी आठवड्यातून दोनदा म्हणजेच बुधवार आणि गुरुवारी या दोन दिवशी घेतली जाणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा उद्रेक कमी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या सुधारित मानक कार्यप्रणालीचे (SOP) पालन करीत न्यायालयीन कामकाज सुरु राहणार आहे. भारताच्या सरन्यायाधीशांनी (CJI) या संदर्भात इतर न्यायाधीशांशी सल्लामसलत करून प्रत्यक्ष सुनावणीचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी ठरल्याप्रमाणे आठवड्याच्या इतर दिवशी हायब्रीड पद्धतीने (hybrid hearing) सुनावणी घेतली जाणार आहे.

राजधानी दिल्लीमध्ये रोजच्या रोज कोरोना संसर्गाच्या रुग्णसंख्येत घट होत चालली आहे. सोमवारी राजधानीत कोरोना विषाणूचे 1151 नवीन रुग्ण आढळले. याचवेळी दिल्लीतील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 7885 पर्यंत खाली आली आहे आणि पॉझिटिव्हिटीचा दर 2.62 वर आला आहे. त्यामुळे कोरोनाची चिंता कमी झाली आहे. (Direct hearing in the Supreme Court two days a week from February 14)

इतर बातम्या

NEET Exam : नीट परीक्षा : इंटर्नशीप डेडलाईनबाबत सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

Supreme Court : ‘कोविन’वरील नोंदणीसाठी आधार कार्ड बंधनकारक नाही; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.